Breaking News
Home / मराठी तडका / अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती चक्क रिमा लागू यांच्या आईने.. 
versatile actress reema lagoo
versatile actress reema lagoo

अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती चक्क रिमा लागू यांच्या आईने.. 

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टी आईच्या भूमिकांनी गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांचे लग्ना अगोदरचे नाव नयन भडभडे असे होते. त्यांचे शालेय शिक्षण गिरगावातील कमळाबाई शाळेमध्ये झाले. बालपणापासूनच अभिनयाची आवड असली तरी शिक्षणाला प्राधान्य देत त्यांच्या आईने त्यांना या कला क्षेत्रापासून दूर रहावे म्हणून पुढील शिक्षणासाठी पुण्यात पाठवले. पुण्यात आंतरशालेय नाट्यस्पर्धा मधून त्यांची अभिनयाची गोडी आणखीनच वाढत गेली.

versatile actress reema lagoo
versatile actress reema lagoo

शिक्षण पूर्ण करून त्या बँकेत नोकरी करू लागल्या परंतु त्यांच्यातील कलाकार त्यांना शांत बसू देत नव्हता.. अभिनयाला वेळ देता यावा यासाठी बँकेतील नोकरीला त्यांनी सोडण्याचे ठरवले. मराठी मालिका तसेच चित्रपट अभिनेते विवेक लागू यांच्यासोबत त्या विवाहबंधनात अडकल्यानंतर रिमा लागू याच नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. अभिनयाचा त्यांचा हा प्रवास व्यावसायिक नाटक, मराठी, हिंदी चित्रपट अशी यशाची शिखरे गाठत होता. मैने प्यार किया, कुछ कुछ होता है, दिवाने, दिल्लगी, येस बॉस, हम साथ साथ है अशा अनेक चित्रपटातून बॉलिवूडमधील मॉडर्न आई उदयास आली होती. २०१७ मधील मे महिन्यात रिमा लागू यांचे हृदयाच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या या अनपेक्षित निधनाच्या बातमीने बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीत सर्वांनी हळहळ व्यक्त केली.

ashok saraf mandakini bhadbhade
ashok saraf mandakini bhadbhade

रिमा लागू यांच्या आई मंदाकिनी भडभडे या देखील मराठी नाट्य तसेच चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात. अशोक सराफांसोबत त्यांनी अरे संसार संसार ह्या चित्रपटात त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती आणि मुलगी रीमा देखील ह्या चित्रपटात होती विशेष. माय लेकीची जोडी असलेला हा त्यांचा पहिला चित्रपट होता. अपराध, वाट चुकलेले नवरे, अन्नपूर्णा, नवरे सगळे गाढव, मुंबईचा फौजदार अशा अनेक मराठी चित्रपट तसेच भटाला दिली ओसरी, सौजन्याची ऐशी तैशी, तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकात त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या. १९४९ च्या सुमारास त्यांनी क्राईम ब्रांच कार्यालयात काही काळ नोकरी देखील केली होती. मंदाकिनी भडभडे यांचेही वयाच्या ८३ व्या वर्षी हृदयाच्या विकाराने निधन झाले होते. त्यांची नात म्हणजेच रिमा लागू यांची मुलगी मृण्मयी लागू ही आपल्या आई आणि आजीच्या पावलावर पाऊल टाकत मराठी चित्रपटातून मुख्य नायिका म्हणून भूमिका साकारू लागली आहे.

mrunmayee lagoo reema lagoo
mrunmayee lagoo reema lagoo

मुक्काम पोस्ट लंडन, हॅलो जिंदगी, दोघात तिसरा आता सगळं विसरा या चित्रपटांमधून मृण्मयी झळकली. नुकताच प्रदर्शित तापसी पन्नू अभिनित थप्पड या बॉलिवूड चित्रपटाचे लेखन मृण्मयीने केले होते. असिस्टंट डायरेक्टर असलेल्या विनय वायकुळ सोबत मृण्मयी विवाहबंधनात अडकली. रिमा लागू यांनी होम स्वीट होम हा अखेरचा चित्रपट साकारला. बॉलिवूडची एक उत्कृष्ट आई म्हणून त्या रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात कायम राहतील यात शंका नाही, रीमा लागू यांच्या या स्मृतीस विनम्र अभिवादन..

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.