Breaking News
Home / मराठी तडका / तुझ्या माझ्या संसाराला…या मालिकेत अमृता पवार सोबत झळकणार सर्वांचा लाडका अभिनेता
amruta pawar new serial
amruta pawar new serial

तुझ्या माझ्या संसाराला…या मालिकेत अमृता पवार सोबत झळकणार सर्वांचा लाडका अभिनेता

झी मराठी वाहिनीवर लवकरच ५ नव्या मालिकांची एन्ट्री होणार आहे. या मालिकांमधून वाहिनीने बऱ्याच जुन्या कलाकारांना पुन्हा एकदा अभिनयाची संधी उपलब्ध करून दिली आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून अभिनेत्री प्रार्थना बेहरेचे मराठी मालिका विश्वात पदार्पण होत आहे. त्यामुळे ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असलेले पाहायला मिळतात. याखेरीज अभिनेत्री अमृता पवार ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतून झी मराठी वाहिनीवर झळकणार आहे.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत अमृता पवार सोबत कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत झळकणार याबाबत गुप्तता बाळगली होती. मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये यात झळकणाऱ्या आणखी काही कलाकारांचा उलगडा होणार आहे मात्र त्या अगोदरच या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. ही महत्वाची भूमिका साकारत आहे अभिनेता “हार्दिक जोशी”.

hardik joshi amruta pawar new marathi serial
hardik joshi amruta pawar new marathi serial

चालतंय की…असे म्हणून हार्दिक जोशीने तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. राणाच्या भूमिकेत एक तगडा कलाकार झी मराठी वाहिनीला मिळाला होता. अंजली आणि राणा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. हार्दिक जोशी ने या मालिकेअगोदर काही मराठी चित्रटातून छोट्या भूमिका साकारल्या होत्या. हापूस चित्रपटात तो एका छोट्या भूमिकेत दिसला होता. हार्दीकला डान्सची देखील आवड आहे. बॉलिवूडमधील काही चित्रपटात बॅक डान्सर म्हणून त्याने काम केले होते. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून प्रथमच त्याला अभिनयाची मोठी संधी मिळाली. आता पुन्हा एकदा हार्दिक जोशी क्सि मराठीवर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” या नव्या मालिकेत अमृता आणि हार्दीकची केमिस्ट्री कशी जुळून येते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. येत्या काही दिवसातच त्यांच्या भूमिका कशा असतील हेही स्पष्ट होईल…

tuzya mazya sansarala aani kay have new serial
tuzya mazya sansarala aani kay have new serial

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.