Breaking News
Home / ठळक बातम्या / घाई घाईत लिहिलेल्या नावामुळे सुप्रिया पिळगावकर यांना NGO ला मदत करणे पडले महागात..
supriya sachin pilgaonkar tweet
supriya sachin pilgaonkar tweet

घाई घाईत लिहिलेल्या नावामुळे सुप्रिया पिळगावकर यांना NGO ला मदत करणे पडले महागात..

अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांना नुकत्याच एका आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर या काही एनजीओजना आर्थिक मदत करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी सचिन पिळगावकर यांच्या ‘नदिया के पार’ या चित्रपटातील सह कलाकार म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सविता बजाज आर्थिक अडचणीत होत्या. त्यावेळी त्यांच्या मदतीला सुप्रिया पिळगावकर धावून आल्या होत्या. सविता बजाज यांना केलेली आर्थिक मदत प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

beautiful supriya pilgaonkar
beautiful supriya pilgaonkar

अशी मदत करताना नव्हामीच सतर्क राहणे गरजेचे आहे असे सुप्रिया पिळगावकर यांनी आपल्या ट्विट द्वारे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रिया पिळगावकर यांनी आपल्या बँक खात्यातून एका सामाजिक संस्थेला देणगी दिली होती. आपल्या खात्यातून ती रक्कम गेली असल्याचा मेसेज देखील त्यांना आला होता. मात्र त्या संस्थेला ही मदत मिळाली की नाही हे तपासण्यासाठी त्यांनी त्या संस्थेला फोनवरुन संपर्क केला. त्यावेळी संस्थेने अशी कुठलीही रक्कम आम्हाला अजूनपर्यँत मिळाली नसल्याचे सांगितले. आपण मदत करत असताना ती रक्कम योग्य व्यक्तीपर्यंत जाते की नाही हे आपण चेक केले पाहिजे नाहीतर माझ्यासारखी फसवणूक होऊ शकते. मी ज्या संस्थेला मदत केली त्या संस्थेचे नाव घाई घाईत लिहिले गेले असावे त्याचमुळे माझ्या खात्यातील रक्कम दुसऱ्याच कोण्या व्यक्तीच्या नावे गेली आहे. नजरचुकीने माझ्याकडून जे घडले त्याबाबत मी तुम्हालाही सतर्क करत आहे.

supriya with daughter
supriya with daughter

काही माहिती लिहीत असताना ती अर्धवट लिहिली जाऊ नये , माहितीत काही चुका असल्यास पैसे ट्रान्सफर करण्यागोदरच ती चूक सुधारण्यात यावी . जेणेकरून आपण जी मदत कोणाला करू इच्छितो ती इच्छित व्यक्तीपर्यंत पोहोचली जावी. सुप्रिया पिळगावकर यांच्या खात्यातून त्यांनी ट्रान्सफर केलेली ती रक्कम त्या संस्थेला मिळालीच नाही ती अन्य कोणाच्या तरी खात्यात गेली. माझी यात फसवणूक झाली असून अशी कुठली मदत करण्याअगोदर विचार करा असे सुप्रिया पिळगावकर यांचे म्हणणे आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.