Breaking News
Home / मालिका / माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत अभिनेत्रीचे झाले आगमन.. नवरा आहे चला हवा येऊ द्या मधील प्रसिद्ध कलाकार
swati deval entry into marathi serials
swati deval entry into marathi serials

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत अभिनेत्रीचे झाले आगमन.. नवरा आहे चला हवा येऊ द्या मधील प्रसिद्ध कलाकार

माझी तुझी रेशीमगाठ या अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या मालिकेत ‘मिनाक्षी’ चे आगमन झाले आहे. मालिकेत मीनाक्षी ही नेहाची वहिनी दर्शवली असून ती नेहाचे दुसरे लग्न लावण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु मला पुन्हा लग्न करायचे नाही असा स्पष्ट नकार देत वहिनीने आणलेल्या वकिलाच्या स्थळाला नेहा नकार देते. मालिकेत नेहाची वहिनी अर्थात मीनाक्षी हे पात्र विरोधी भूमिका दर्शवताना पाहायला मिळत आहे. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात …

swati deval entry into marathi serials
swati deval entry into marathi serials

नेहाची वहिनी म्हणजेच मिनाक्षीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे “स्वाती देवल”. स्वाती देवल ही मराठी मालिका, चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहे. फु बाई फु या शो मधून तिने आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘चल धर पकड’, ‘आम्ही सातपुते’, ‘वन टू का 4’, ‘असा मी असामी’ , ‘कुंकू’, ‘वादळवाट’, ‘पुढचं पाऊल’ अशा विविध चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून स्वातीने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. या सर्व कलाकृतीतून तिच्या वाट्याला नेहमीच विनोदी तसेच खलनायकी ढंगाच्या भूमिकाच आलेल्या दिसल्या. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून ती मात्र विरोधी भूमिकेत पाहायला मिळत आहे. अर्थात नेहाचे लग्न होण्यासाठी ती पैसेही घेत असल्याचे दिसते त्यामुळे पुढे जाऊन हे पात्र नेहाच्या बाबतीत काय काय निर्णय घेणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

swati deval serial mazi tuzi reshimgath
swati deval serial mazi tuzi reshimgath

अभिनेत्री स्वाती देवल ही संगीत दिग्दर्शक “तुषार देवलची” पत्नी आहे. २६ ऑक्टोबर २००३ मध्ये त्यांनी लग्न केले होते. स्वाती आणि तुषार या दोघांची लव्ह स्टोरी फारच मजेशीर आहे. स्वाती एका नाटकाच्या इंटरव्ह्यूसाठी गेली होती तिथेच तुषार येणाऱ्या कंटेस्टंटची नोंदणी करत असे. स्वाती ज्यावेळी इंटरव्ह्यूसाठी आली त्यादिवशी तुषार मात्र गैरहजर राहिला होता. नाटकाच्या तालमीला निवडलेल्या नावांमध्ये स्वाती हे नाव अनोळखी वाटल्याने स्वाती नेमकी कोण असावी हा प्रश्न त्याला वारंवार पडत असे. शेवटी ती स्वाती त्याला सापडली आणि पाहताक्षणी तो तिच्या प्रेमात पडला. अनेकदा त्याने स्वातीला ‘मी तुला आवडतो का?’ … असा प्रश्न विचारला. यावर स्वाती नेहमी त्याला म्हणायची की, हो! तू माझा खूप चांगला मित्र आहेस. योग्य उत्तर न मिळाल्याने त्याने एकदा स्वातीला खिडकीबाहेर काहीतरी असल्याचे खुणावत असताना तिला घट्ट मिठी मारली. जवळपास ४ ते ५ मिनिटं तुषारने स्वातीला आपल्या मिठीत कवटाळले होते. त्यानंतर तुषारसोबत लग्नासाठी तिने आपला होकार कळवळा. कारण स्वातीचा असा गैरसमज होता की, ‘ज्या मुलाने आपल्याला मिठी मारली आता त्याच्याशीच लग्न करावे लागणार’ … हा मजेशीर किस्सा नुकताच तुषारने झी वाहिनीच्या प्रेक्षकांना सांगितला होता.

swati deval husband tushar deval
swati deval husband tushar deval

स्वाती आणि तुषार यांना ‘स्वराध्य’ हा एकुलता एक मुलगा. स्वराध्यला देखील तुषार प्रमाणे संगीताची आवड आहे. आतापासूनच तो त्याच्या वडिलांकडून संगीताचे धडे गिरवत आहे. तुषार देवल गेल्या कित्येक वर्षांपासून ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावरून प्रेक्षकांसमोर आला आहे. या शो मधून अनेकदा त्याची खिल्ली देखील उडवताना दिसली. अनेक वर्षानंतर स्वाती देवल पुन्हा एकदा झी वाहिनीवर झळकताना दिसत आहे. माझी तुझी रेशीमगाठ या नव्या मालिकेनिमित्त अभिनेत्री स्वाती देवल हिला Kalakar.info टीम तर्फे शुभेच्छा आणि अभिनंदन….

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.