Breaking News
Home / मराठी तडका / या मराठी अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे “कन्या रत्न” झाले प्राप्त..
smita tambe gave birth to a girl
smita tambe gave birth to a girl

या मराठी अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे “कन्या रत्न” झाले प्राप्त..

​​​७२ मैल एक प्रवास ​या चित्रपटातील राधाक्का आठवतेय का.. ही प्रसिद्ध भूमिका लीलया निभावणारी मराठमोळी स्मिता तांबे हि मराठी​ आणि हिंदी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. स्मिताने ​बाणेदार अभिनयाने रसिकांवर छाप पाडली आहे. स्मिताचा ​​​जन्म सातारा जिल्ह्यामध्ये ​​११ मे १९८३​​ रोजी ​​झाला​ असून, ​बालपण पुण्यात गेले. स्मिताचे शालेय शिक्षण मॉडर्न हायस्कुल, निगडी येथे झाले. आकुर्डीतील म्हाळसाकांत कॉलेजमध्ये तिने अभिनयाचे प्राथमिक धडे गिरवले. ​जानेवारी २०१९ मध्ये अभिनेत्री स्मि​​ताचे नाट्यकलाकार वीरेंद्र द्विदेवी सोबत ​लग्न झाले होते.. चित्रपट सृष्टीत ​संधी शोधण्यासाठी मुंबईत स्थायिक झाली. तिने मराठी लोकसाहित्यामध्ये​ पीएचडी​ अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

smita tambe weds virendra dwivedi
smita tambe weds virendra dwivedi

​​​तुकाराम, जोगवा,​ अनुबंध, लाडाची लेक गं या मालिका, ​७२ मैल एक प्रवास​, परत​, गणवेश हे चित्रपट आणि ‘हमिदाबाईची कोठी’ या नाटकातून तिने आपल्या अभिनयचा उच्चांक गाठला. ​​मराठी सोबतच स्मिताने हिंदी मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनायचा ठसा उमटवला आहे. ​याच बरोबर ती ​​नूर, डबल गेम​, ​सिंघम रिर्टन, रुख, ​या ​बॉलिवूड चित्रपटांमध्येही ​ अभिनय करण्याची संधी मिळाली.. सॅक्रेड गेम्सच्या २ ऱ्या सीझनमध्ये ​आणि माय नेम इज शीला या दोन वेबसीरिजमध्ये​ तिने ​प्रभावी भूमिका केल्या आहेत. अक्षय कुमारची निर्मिती असलेल्या ​​७२ मैल एक प्रवास ​हा चित्रपट प्रेक्षकांना विशेष भावला, तिने रंगवलेली ​​राधाक्का ​चे सादरीकरण ​आजही प्रेक्षकांच्या ​मनावर कोरलेले आहे.

smita tambe
smita tambe

​नुकताच स्मिताचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला, त्याचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. ​या खास प्रसंगी​ तिच्या​ मैत्रिणींनी मिळून ​​स्मिताला फुलांच्या माळांनी ​सजवले होते, चित्रपटातील डोहाळे गाणी म्हणत स्मिता भोवती फेर धरला. कुणीतरी येणार येणार गं​​ या​ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रित​ गाण्यावर सग​​ळ्या जणींनी ठेका धरला. शिवाय स्मिताचे पति वीरेंद्र यांनीही या सोहळ्यात ​छानसे नृत्य ​केले.. ​आज स्मिता आणि धीरेंद्र यांना कन्यारत्न प्राप्त झाले असून मित्र परिवारात आनंदोत्सव साजरा होत आहे. दोघांनाही शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत आहे. स्मिता तांबे ​चित्रपट ​निर्माती आहे हे खूप कमी जणांना माहित आहे. ‘रिंगिंग रेन’ हे तिची फिल्म प्रॉडक्शन ​कंपनी आहे. तिने ‘सावट’ या चित्रपटाती निर्मिती केली​ होती, यात तिने ए.सी.पी. आदिती देशपांडेची भूमिका साकारली.​ अशा या हरहुन्नरी कलाकार जोडप्याला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

baby shower fulwa, aditi sarang, amruta sant, resha tipnis
baby shower fulwa, aditi sarang, amruta sant, resha tipnis

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.