Breaking News
Home / मालिका / रंग माझा वेगळा मालिकेत नवी एन्ट्री.. ही मुलगी साकारणार “कार्तिकीची” भूमिका
saisha bhoir
saisha bhoir

रंग माझा वेगळा मालिकेत नवी एन्ट्री.. ही मुलगी साकारणार “कार्तिकीची” भूमिका

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेने लीप घेतलेला आहे लवकरच या मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या मुली नव्याने एन्ट्री घेताना दिसणार आहेत. मालिकेत कार्तिक ‘दीपिकाचा’ सांभाळ करतो आहे तर दीपा ‘कार्तिकी’ चा सांभाळ करताना दिसत आहे. या दोन्ही मुलींमुळे दीपा आणि कार्तिक पुन्हा एकत्र येतील का ह्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. मालिकेचा एक प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला ज्यामध्ये दिपाची मुलगी कार्तिकी आणि कार्तिकची मुलगी दीपिका एकत्र खेळत असतात, परंतु त्यात कार्तिकी आपल्याला वडील नसल्याचे सांगते तर दीपिका आपल्याला आई नसल्याचे सांगते. तितक्यात दीपा तिथे येते आणि कार्तिकीला घेऊन जाते. मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण करीत आहे.

saisha bhoir
saisha bhoir

आज ह्या चिमुरड्या कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकारबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या चिमुरडीचे नाव आहे “साईशा भोईर”. साईशा भोईर ही चाईल्ड मॉडेल आहे. काही नामांकित ब्रँड साठी तिने रॅम्पवॉक केले आहे. साईशा आणि तिचे कुटुंब कल्याणला वास्तव्यास आहे. तिचे वडील विशांत भोईर यांना म्युजिकची आणि ट्रॅव्हलिंगची आवड आहे. साईशा युट्युब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर नेहमी आपले व्हिडीओज अपलोड करत असते. तिच्या या वेगवेगळ्या व्हिडिओजना चाहत्यांकडून मोठी पसंती देखील मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नृत्य, अभिनय याशिवाय साईशा कुकिंग करतानाचे व्हिडीओज देखील अपलोड करताना दिसते. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याद्नेश दौंड दिग्दर्शित ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ या एका व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देण्यात आला होता, त्यात साईशा महत्वाची भूमिका साकारताना दिसली होती.

child actress saisha bhoir
child actress saisha bhoir

साईशाची आई पूजा कदम भोईर आपल्या लेकीला नेहमीच प्रोत्साहन देताना दिसते. याचमुळे साईशा कला क्षेत्रात आपला जम बसवताना दिसत आहे. सोशल मीडिया स्टार बनलेली साईशा लवकरच आपल्या पहिल्या वहिल्या मालिकेतून अभिनय साकारताना दिसणार आहे. स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेतून साईशा दिपा आणि कार्तिकची मुलगी कार्तिकीची भूमिका साकारताना दिसणार आहे. कार्तिकीला सांभाळण्याची जबाबदारी सध्या दिपाने स्वीकारली आहे. कार्तिकी आणि दीपिका यांच्यामुळे त्यांचे आई वडील पुन्हा एकत्र येणार का हे पाहणे आता रंजक होणार आहे. तुर्तास या पहिल्या वहिल्या मालिकेनिमित्त साईशा भोईर हिला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन…

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.