Breaking News
Home / मालिका / दहशतग्रस्त मुंबईत एक डॉक्टरचा भयपट.. अभिनेत्री मृन्मयी देशपांडे डॉ. सुजाताच्या दमदार भूमिकेत
mrunmayee deshpande rao as dr sujata
mrunmayee deshpande rao as dr sujata

दहशतग्रस्त मुंबईत एक डॉक्टरचा भयपट.. अभिनेत्री मृन्मयी देशपांडे डॉ. सुजाताच्या दमदार भूमिकेत

मुंबई डायरीज २६/११ वेब सिरीजमध्ये आश्चर्यकारक सिनेमॅटोग्राफी असून कथा खूपच भावनिक आणि जबरदस्त आहे. आत्तापर्यंत मालिकेत डॉक्टरांसाठीचे अत्यंत नाजूक कामकाजाची रोजची परिस्थिती, कामाचा तणाव आणि त्यातच दहशतवाद्यांची एक टोळी मुंबईत कसा धुमाकूळ घालते, हे सर्व ऍक्शन सीन्स आणि व्हीएफएक्सद्वारे दाखविलेले एनिमेशन अतिशय सफाईदार आणि परफेक्ट आहेत. यात दिग्दर्शनकाने खूपच कल्पकतेने भारतीय माध्यमांचे वास्तव उघड केलेले पाहायला मिळते.

mrunmayee deshpande rao as dr sujata
mrunmayee deshpande rao as dr sujata

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे भावना, नाटक, थ्रिलर यांचे तेहेरी मिश्रण असलेल्या या वेबसीरिजमध्ये डॉक्टर सुजाता हीची मुख्य भूमिका साकारत आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या ध्येर्याची आणि धाडसाची कथा मूर्त रूपातमृण्मयीने साकारली आहे. अभिनेता मोहित रैनाने नेहमीप्रमाणे त्याच्या अदाकारीने मालिकेत अक्षरशः जादू केली आहे. मुंबई डायरीज ही वेबसीरिज सध्या अ‍ॅमेझॉन प्राईम १०० हुन अधिक देशांमध्ये प्रदर्शित करीत आहे; कलाकारांच्या दमदार अभिनयासाठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देखील मिळवला आहे. दहशतवादी हल्ल्यामध्ये निस्वार्थपणे कार्यरत असलेल्या आणि मुंबईकरांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी तसेच रुग्णालयातील कर्मचारी, मुंबईकरांनी कशी एकजुट दाखवली ही आजपर्यंत प्रकाशझोतात न आलेली कहाणी या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना भावली आहे.

mrunmayee rao
mrunmayee rao

अभिनेत्री मृन्मयी देशपांडे (डॉ. सुजाता अजवाळे), प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा (डॉ. चित्रा दास), मोहित रैना (डॉ. कौशिक ओबेराय) या सर्वांनी अष्टपैलू अभिनय सादर केला आहे. सोबत टीना देसाई (अनन्य घोष), श्रेया धन्वंतरी (मानसी हिराणी), सत्यजित दुबे (अहान मिर्झा), प्रकाश बेलवडी (डॉ. मनी सुब्रमण्यम), नताशा भारद्वाज (दिया पारेख) अशा नावाजलेल्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून निखिल अडवाणी व निखिल गोन्साल्विस या दोघांनी ही वेब सिरीज दिग्दर्शित केली आहे. २६/११ च्या भयाण वास्तवावर आधारित ही सर्वोत्तम मालिका ठरणार आहे यात शंका नाही. प्रत्यक्ष स्थळी आरोग्य आपत्कालीन क्षेत्रातील डॉक्टर व कर्मचारी, पोलीस, एनएसजी या सर्वांनी केलेल्या देशसेवेबद्दल मनापासून आभार मानायला हवेत. खरंच भविष्यात अशा विशिष्ट घडामोडींवर आधारित मालिका प्रेरणादायी ठरतील.

mumbai dairies 26-11 cast
mumbai dairies 26-11 cast

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.