Breaking News
Home / मालिका / प्रार्थना बेहरेने मालिकेतून घेतला ब्रेक.. आता यश घेणार परीची काळजी
prarthana behere shreyas talpade

प्रार्थना बेहरेने मालिकेतून घेतला ब्रेक.. आता यश घेणार परीची काळजी

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत गेल्या काही भागांपासून नेहा नाराज झालेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून बंडू काकांना घेऊन ती पॅलेसमध्ये राहायला आलेली असते मात्र सिम्मी काकूंमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. याचमुळे नेहा पॅलेस सोडून तिच्या चाळीतल्या घरी निघून गेलेली असते. नेहाचा रुसवा दूर करण्यासाठी आजोबा काका आणि यश नेहाच्या घरी येतात आणि तिची नाराजी दूर करतात हे येत्या काही दिवसातच मालिकेत पाहायला मिळणार आहे. मात्र नेहा आता तिच्या ऑफिसमध्ये पुन्हा सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. ऑफिसच्या काही कारणास्तव तिला लंडनला जावे लागणार आहे.

prarthana behere shreyas talpade

येत्या काही दिवसातच मालिकेतला हा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नेहा लंडनला जात असल्याने परीची जबाबदारी यशकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. आपल्या लेकीला सोडून जाताना आईची अवस्था कशी होते हे मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मालिकेतला हा ट्विस्ट प्रार्थना बेहरेमुळेच आणावा लागला आहे हे आता समोर आले आहे. प्रार्थना बेहरेने काही काळासाठी या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. काही दिवसांसाठी ती खरोखरच लंडनला जाणार आहे त्यामुळे मालिकेत हा ट्विस्ट आणला जात आहे. प्रार्थना बेहरेला तिच्या वैयक्तिक कारणासाठी लंडनला जावे लागत आहे यामुळे काही दिवस ती मालिकेतून दिसणार नाही. नेहा मालिकेत का दिसत नाही?

shyreas talpade myra vaikul
shyreas talpade myra vaikul

यासाठी हा ट्विस्ट आणण्यात येणार आहे. आपले काम झाल्यानंतर प्रार्थना पुन्हा एकदा मालिकेत सक्रिय होत आहे. असे ट्विस्ट बहुतेक मालिकेतून पाहायला मिळालेले आहेत. एका मालिकेसोबतच आणखी काही प्रोजेक्ट हाती घेतल्याने कलाकारांना तारेवरची कसरत करावी लागते. श्रेयस तळपदेने देखील आपडी थापडी या आगामी चित्रपटात निमित्त मालिकेतून ब्रेक घेतला होता. तर संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मालिका सृष्टीतील सर्वात व्यस्त कलाकार आहे. एकाच वेळी माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका, किचन कल्लाकारचा शो आणि तू म्हणशील तसं हे नाटक अशा तीन प्रोजेक्टमधून तो काम करत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ही तारेवरची कसरत म्हणावी लागणार आहे. त्याच कारणास्तव ही कलाकार मंडळी मालिकांमधून वारंवार ब्रेक घेताना पाहायला मिळतात.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.