Breaking News
Home / मालिका / सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिनेत्रीला विशेष कारणामुळे सोडावी लागली मालिका
pramitee preet sundara manamadhye bharali
pramitee preet sundara manamadhye bharali

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिनेत्रीला विशेष कारणामुळे सोडावी लागली मालिका

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने बऱ्याच महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रेक्षांच्या मनात उत्सुकता कायम टिकून ठेवला आहे. नुकतीच मालिकेतील अभिनेत्री प्रमिती प्रीतने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने मालिकेत पुढे न दिसण्याचे कारण धूसरस्य माहितीद्वारे सांगितले आहे. अभिनेत्री प्रमिती प्रीत हिने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत हेमा जहागिरदार हिचे पात्र साकारले. पोस्ट लिहताना मला अश्रू अनावर होत असल्याचे तिने म्हटले आहे.

pramitee preet sundara manamadhye bharali
pramitee preet sundara manamadhye bharali

अभिनेत्री प्रमिती प्रीत पोस्टमध्ये लिहते “माझे आयुष्य काल वेगळे होते आणि आज ते … आहे. मी आता माझ्या जवळच्या प्रकल्पाचा भाग नाही, SMB. हे लिहिताना मला सर्व अश्रू अनावर झाले आहेत. पण शो मस्त गो ऑन. मी मालिकेत आहे किंवा नाही हे माहित नाही पण माझे हृदय सर्वांसोबत नेहमीच असेल. सुंदरा मना मध्ये भरली सोबतचा एका वर्षाचा प्रवास अभूतपूर्व आहे. मला त्यातील प्रत्येक सेकंदावर प्रेम आहे. सर्वांचे खूप आभार. मी आता माझ्या आरोग्यास सामोरे जाण्यासाठी थोडा वेळ घेईन. आपण हेमाला दिलेल्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद. मी तुम्हा सर्वांवर मनापासून प्रेम करते.” या पोस्टमध्ये तिने तिच्या आरोग्याच्या कारणास्तव मालिकेतून माघार घेतलं असल्याचं लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी चेहऱ्यावर थोडेसे इन्फेक्शन झाल्यामुळे तिचा चेहरा खराब झाला होता. मालिकेतील तिच्या हटके लूकसाठी तिला अनेकदा वेगवेगळा मेकअप करावा लागत असल्यामुळे इन्फेक्शन आणखीनच वाढू लागले असल्याचे समजते. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता तिने हि मालिका सोडली असल्याचे तिने सांगितले आहे. मालिकेतून ती बाहेर पडली असली तरी मालिकेशी ती वर्षभर जोडली गेली तिच्या आठवणी तिच्या हृदयात कायम राहतील असं ती म्हणते.

pramitee preet SMB serial
pramitee preet SMB serial

अभिनेत्री प्रमिती प्रीत हिचे आई आणि वडील दोघेही शिक्षण क्षेत्राशी निगडित आहे. आपली मुलगी शिकून मोठी अधिकारी व्हावी अशी वडिलांची इच्छा होती पण मुलीला अभिनयात इंटरेस्ट होता हे पाहून त्यांनी तिला मास कम्युनिकेशन करायला प्रोत्साहित केले. तू माझा सांगाती आणि गर्जा महाराष्ट्र या मालिकांमध्येही तिने अप्रतिम अभिनय साकारला होता. “तू माझा सांगाती” मालिकेत तुकाराम महाराजांची पत्नी आवली हिची भूमिका साकारण्याची तिला संधी मिळाली होती. आवलीची तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती, त्यामुळेच तिला सुंदरा मनामध्ये भरली हि मालिका मिळाली हे प्रेक्षकांना माहित आहे. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत तिची निगेटिव्ह भूमिका असून देखील तो प्रेक्षकांना आवडली होती. अभिनेत्री प्रमिती प्रीत लवकरच पूर्णपणे बरी होऊन पुन्हा मालिकेत पाहायला मिळो अशी प्रार्थना करूया, तिने साकारलेली प्रत्येक भूमिका रसिक प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत हे मात्र खरं.

actress pramitee preet
actress pramitee preet

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.