Breaking News
Home / मालिका / विकास पाटीलचा मुलगा गेल्या ५ वर्षांपासून आहे आजारी.. ३ वर्षांचा असताना झाला होता..
vikas patil big boss marathi son mourya
vikas patil big boss marathi son mourya

विकास पाटीलचा मुलगा गेल्या ५ वर्षांपासून आहे आजारी.. ३ वर्षांचा असताना झाला होता..

​चॉकलेट हिरो म्हणून अभिनेता विकास पाटीलने मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बायको अशी हवी’ या मालिकेतून ​​त्याने विभासची मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतून तो काहीशा विरोधी भूमिकेत दिसला होता मात्र कालांतराने मालिकेच्या शेवटच्या क्षणी विभास हळूहळू जान्हवीच्या प्रेमात पडला.

vikas patil big boss marathi son mourya
vikas patil big boss marathi son mourya

या मालिकेच्या एक्झिटनंतर विकास पाटील बिग बॉसच्या घरात दाखल झाला. इथे वेगवेगळ्या टास्कमधील त्याच्या कामगिरीने प्रेक्षकांची मने त्याने जिंकून घेतलेली पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरात विकास आणि विशालची चांगली मैत्री झाली आहे. काही आठवड्याच्या कालावधीनंतर नुकतेच विकासने आपल्या मुलाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे की​,​ तो गेल्या काही वर्षांपासून आजाराशी झुंज देत आहे. त्याने हा खुलासा करताच तिथे असलेल्या सदस्यांना देखील आपले अश्रू अनावर झाले होते.​ ​विकास पाटीलचा मुलगा मौर्य हा ३ वर्षांचा होता त्यावेळी इतर मुलांसोबत खेळत असताना तो सोसायटीत असलेला एका पाण्याच्या टाकीत पडला. जवळपास ७ ते ८ मिनिटं तो त्या पाण्यातच होता. त्यानंतर त्याला लगेचच उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. गेल्या ५ वर्षांपासून तो या भयावह घटनेला विसरू शकलेला नाही.

vikas wife swati patil and mourya
vikas wife swati patil and mourya

मौर्य आता ८​ वर्षांचा झाला आहे​,​ मात्र अजूनही तो त्यातून स्वतःला सावरू शकला नाही. या आजारातून तो योग्य उपचार घेऊन बरा होऊ शकतो असे विकास बिग बॉसच्या घरात म्हणतो.​ माझा मुलगा अजूनही या घटनेमुळे खूपच घाबरला आहे. माझी पत्नी स्वाती हिची देखील खूप मोठी साथ मला मिळत आहे. तिच्या मदतीशिवाय काहीच झालं नसतं. डॉक्टरांचे उपचार चालू आहेत आणि यातून बरं व्हायला अजून काही काळ लागणार असल्याचे ते सांगतात.​ ​आपल्या मुलाच्या या परिस्थितीमुळे विकास खूप काळजीत वाटला आणि​ भावून होऊन मुलाच्या​ ​आठवणीत रमला.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.