Breaking News
Home / बॉलिवूड / ​’या’ अभिनेत्रीने सलमान खान सोबत​ चित्रपटात​ काम करण्यास ​नकार दिला होता..​
salman khan
salman khan

​’या’ अभिनेत्रीने सलमान खान सोबत​ चित्रपटात​ काम करण्यास ​नकार दिला होता..​

मित्रहो बॉलिवूड मध्ये स्वतःला पारखायची संधी मिळाली की कोणीही हर्षित होतो. इथे कला​गुण असणे फार महत्वाचे असते, स्वतःला विसरून एखाद्या नव्या भूमिकेत सहज प्रवेश करता आला पाहिजे. अभिनय करणाऱ्या कलाकाराच्या दुनियेत खूपशा गोष्टी रंजक घडतात. या चित्रपट सृष्टीत काम करण्यासाठी शैक्षणिक पात्रता जास्त असावी लागत नाही, भूमिकेतील पात्राचे आयुष्य जगता आले की कलाकार पात्र ठरला जातो. लोक म्हणतात की अभिनय क्षेत्रात करिअर व्हायला नशीब चांगले असावे लागते. कदाचित हे सत्य आहे, पण नशीबाहून महत्वाचे आहे आपली आत्मीयता, मेहनत. चित्रपट सृष्टीत स्वतःला पडद्यावर आणण्यासाठी जिद्द​ असावी​च ​लागते.

बॉलिवूड मध्ये अनेक छोटे मोठे कलाकार कार्यरत आहेत, यातील जे सुपरस्टार आहेत त्यांच्यामागे पूर्ण दुनिया वेडी आहे. त्यांना पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक असतात. कधी जर चुकून आपल्याला या सुपरस्टार सोबत काम करायला मिळाले तर कोणत्याही सामान्य माणसाचा आनंद गगनात न मावणारा असतो. पण बॉलिवूड मध्ये एक अभिनेत्री अशी आहे ज्या अभिनेत्रीला वयाच्या सोळाव्या वर्षी सुपरस्टार सलमान सोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. पण तीने स्पष्ट नकार दिला होता, यामागील कारण ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले. बॉलिवूडचा भाईजान म्हणून प्रसिद्ध असणारा सलमान खान याला आज कोण नाही ओळखत. तो लाखो लोकांचा आवडता अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाले आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने तो सतत चर्चेत असतो, जगभरातील लोक त्याचे दिवाने आहेत. सलमान फक्त एक अभिनेता म्हणूनच नाही तर तो एक ​मसीहा म्हणून देखील लोकांच्या आवडीचा आहे. त्याने आजवर अनेक गरजूंना मदत केली असून त्यांना अडचणीतून बाहेर काढले आहे. त्याने भरपूर अभिनेत्रींसोबत काम केले असून , प्रत्येक अभिनेत्री त्याला सहज पसंत करते. पण बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने सलमान सोबत काम करण्यास नकार दिला होता​.​

shradha kapoor
shradha kapoor

 

​होय हे सत्य आहे, श्रद्धा जेव्हा सोळा वर्षाची होती तेव्हा तीला सलमान सोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती पण तीला आपला अभ्यास, शिक्षण पूर्ण करायचे होते. श्रद्धा याबद्दल म्हणाली की १५ – १६ हे वय वर्ष खूपच कमी आहे. तीला नेहमीच चित्रपटात काम करण्याची इच्छा होती पण सर्व शिक्षण पूर्ण झाल्यावर याबद्दल तीला विचार करायचा होता. तीला प्रथम आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करून स्वतःची शैक्षणिक पात्रता वाढवायची होती नंतर या चंदेरी दुनियेत पदार्पण करायचे होते.कदाचित श्रध्दाचा हा निर्णय योग्य होता, कारण १५​-​१६ हे वय वर्ष चंदेरी दुनियेत झळकण्यासाठी खूप कमी आहे, कोणत्याच गोष्टींचा अनुभव नसतो. पण भावनेच्या आहारी जाऊन चित्रपटात काम करण्यासाठी कोणीही सहज तयार होतात. यामुळे काही कलाकारांनी स्वतःचे शिक्षण देखील अपूर्ण ठेवले आहे.
shradha shakti kapoor
shradha shakti kapoor

 

काहीजणांना अपूर्ण राहिलेल्या शिक्षणाबद्दल आजही खूप वाईट वाटते. चित्रपट सृष्टीत जरी कार्यरत राहायचे असले तरीही आपण आपले प्रथम शिक्षण पूर्ण करणे गरजेचे ​वाटायला हवे. श्रद्धा कपूर ही सध्याची बॉलिवूड मधील सुंदर, प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तीने “तीन पत्ती” या चित्रपटातून २०१० मध्ये डेब्यु केला होता. यानंतर ती बागी ​१ ​मध्ये पण दिसली होती, तीचा आशिकी चित्रपट देखील भरपूर लोकप्रिय झाला आहे. ती बागी ३ मध्ये सुद्धा झळकली असून  हल्ली जानेवारी महिन्यात ” स्ट्रीट डान्सर थ्री ” हा तीचा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने जवळपास ​२​६८ कोटींची कमाई केली हो​​ती. यामध्ये तिच्यासोबत वरुण धवन देखील दिसला होता. श्रद्धाचे सर्व चित्रपट चाहते फार आवडीने पाहतात. श्रद्धा अशीच प्रगती करत राहो ही सदिच्छा. मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.