Breaking News
Home / मालिका / ​​जीव माझा गुंतला या मालिकेतून येत आहे ‘ही’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री​..
pratiksha mungekar
pratiksha mungekar

​​जीव माझा गुंतला या मालिकेतून येत आहे ‘ही’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री​..

मित्रहो, छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रदर्शित होत असतात, या मालिकांच्या द्वारे अनेक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. या कलाकारांना रोज पडद्यावर पाहिल्यामुळे रसिक त्यांच्या बद्द​​ल भरपूर माहिती मिळवतात, दिवसेंदिवस ते कलाकार जास्त ओळखीचे बनतात. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या ​​मालिका जरी संपल्या असल्या तरी त्यांच्या अभिनयाची छटा अजुनही प्रेक्षकांच्या मनावर उमटलेली आहे, त्या अभिनेत्रींना लोक अजूनही खूप पसंत करतात. कधी कधी त्या अभिनेत्री पुन्हा दुसऱ्या मालिकेतून भेटीस येतात, तेव्हा त्यांचे चाहते आणखीन आनंदित होतात.

कलर्स मराठी वाहिनीवर अनेक सुंदर मालिका आपणास पाहायला मिळतात, त्या मालिका आपणाला खूप काही शिकवून जातात. त्यातील कलाकार नेहमी आपल्या भेटीला येत असतात त्यामुळे भरपूर लोक त्यांना पसंत करतात. कलर्स मराठी वरील सर्व कलाकार भरपूर प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाच्या कलेतून प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांनी निभावलेल्या उत्कृष्ट भूमिकेमुळे दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. सध्या कलर्स मराठी वर आणखीन एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कलर्स मराठी वर सर्व सुंदर मालिकांमध्ये आता ” जीव माझा गुंतला ” ही एक नवी मालिका प्रदर्शित होत आहे. या मालिकेतील सर्व कलाकार उत्कृष्ट असून त्यांची विशेषता खूप छान आहे. या मालिकेतून आपल्या ओळखीची अभिनेत्री देखील पडद्यावर दिसणार आहे. या मालिकेचे काही प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून मालिकेबद्दलची उत्सुकता रसिकांच्या मनात ताणली जात आहे. या मालिकेतून आपली सर्वांची आवडती प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या भेटीस येत आहे. त्यामुळे मालिकेत कोण कोण कलाकार आहेत, किंवा मालिकेची कथा काय असेल या बद्दल उत्सुकता निर्माण होत आहे.

marathi actress pratikasha mungekar
marathi actress pratikasha mungekar

प्रतीक्षा ही अनेक प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री असून तीच्या अभिनयाचे भरपूर लोक दिवाने आहेत. घाडगे & सून या मालिकेतील सर्व पात्रांची आपल्याला चांगलीच ओळख आहे, या मालिकेने अनेकांना आपलेसे केले होते. मालिकेचे कथानक देखील खूप रंजक होते. यातील सर्व पात्रे लोकप्रिय झाली होती, तसेच यातील कियारा ची भूमिका साकारणारी ​​प्रतीक्षा मुणगेकर ही अभिनेत्री अनेकांच्या मनात घर करून आहे, यातील तीचा अभिनय खूप आकर्षक आहे. अगदी सहज, सुंदर वाटतो. अशी सहज सुंदर अभिनय करणारी प्रतीक्षा घाडगे & सून या मालिकेनंतर आता ” जीव माझा गुंतला ” या मालिकेतुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेची रसिक खुपच आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेत प्रतीक्षा चित्रा खानविलकर च्या भूमिकेत दिसणार आहे, याबद्दल बोलताना ती म्हणते की, तीला मिळालेल्या या संधी मुळे अगदी घरी परतल्यासारखे वाटत आहे. पूर्ण तीन वर्षांनंतर ती पुन्हा कलर्स मराठी च्या पडद्यावर दिसणार असल्यामुळे ती म्हणते की हा योगायोग आहे, वाहिनी आणि प्रोडक्शन हाऊस ने तीच्या वर एवढा विश्वास दाखवला असल्याने तीला स्वतःची जबाबदारी वाढल्यासारखे वाटत आहे.

actress pratikasha mungekar
actress pratikasha mungekar

त्यामुळे ती आपल्या कामाबद्दल खूप गंभीर आहे, सेट वर काम करताना तीला मजा येत असल्याचे तीने सांगितले आहे. तीच माणसे पुन्हा आजूबाजूला दिसत असल्याने तीला तेथील वातावरण खूप सकारात्मक वाटत आहे. त्यामुळे अगदी जोमाने ती पुन्हा तयारीला लागले आहे. आता तिची एवढीच इच्छा आहे की जसे कियारा च्या भूमिकेला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले तसेच आता चित्रा च्या भूमिकेला देखील चाहत्यांनी भरभरून प्रेम द्यावे. ही मालिका खूप रंजक रूप धारण करून पडद्यावर झळकणार आहे. यामध्ये दोन व्यक्ती अगदी भिन्न स्वभावाच्या आहेत, अंतरा आणि मल्हार या दोघांच्या बाबतीत देखील असेच काहीसे घडणार आहे. या दोघांचा ही स्वभाव अगदी भिन्न असून ते दोघे एकमेकांच्या समोर आल्यावर काय घडेल, हे दोघे एकमेकांचा तिरस्कार करत असतात. पण नियती या दोघांनाही पुन्हा एकत्र आणते. या दोन भिन्न माणसांना जेव्हा नियती एकाच सूत्रात बांधते तेव्हा त्यांच्या नात्याचा पुढचा प्रवास कसा करतात ते पाहायला खूप मजा येईल. त्यामुळे नक्की बघा सोम ते शनी ९:३० वाजता ” जीव माझा गुंतला “. तर मित्रहो यामध्ये आपली प्रतीक्षा देखील दिसणार असल्याने ही मालिका खूप रंजक वळण घेत राहील. आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.