माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे परी म्हणजेच सर्वांची लाडकी मायरा वायकुळ प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वीच मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने मायराची आई श्वेता वायकुळ यांनी परीला दिलेल्या प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तुमच्या प्रतिसादामुळे मायराला लोकप्रियता मिळाली असे त्यांनी यावेळी म्हटले. मायराचे आई बाबा सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतात. मायराचे अनेक चाहते तीला इन्स्टग्राम युट्युबवर फॉलो करतात. मालिकेत येण्याअगोदर पासूनच मायरा सोशल मीडिया स्टार बनली होती. तिची ही प्रसिद्धी मालिकेमुळे अधिक वाढलेली पाहायला मिळाली.
काही दिवसांपूर्वी मायराचे बाबा गौरव वायकुळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक नवी कार खरेदी करण्यात आली आहे. द न्यू वॅगन आर मारुतीच्या ब्रॅंडच्या या कारची किंमत मार्केटमध्ये जवळपास ६ लाखांच्या घरात पोहोचते. वायकुळ कुटुंब हे सधन कुटुंब आहे. मायराची आज्जी देखील बँकेमध्ये कार्यरत होत्या. तर मायराचे वडील गौरव वायकुळ यांनी एमबीए केलं असून फायनान्शियल ऍडव्हायझर म्हणून त्यांनी काम केले आहे. श्वेता वायकुळ या मायराला कायम प्रोत्साहन देत असतात. त्या स्वतः मायराला मालिकेच्या सेटवर घेऊन येतात. मालिकेच्या कलाकारांसोबत त्यांची छान गट्टी जमली आहे. त्यामुळे अगदी बिनधास्तपणाने त्या सेटवर वावरत असतात.
मार्च महिन्यात मायराच्या घरी इलेक्ट्रिक कारची खरेदी करण्यात आली होती. गो ग्रीन असे म्हणत पर्यावरणाचा विचार करून त्यांनी ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार केला होता. मायराचा प्रत्येक सिन चांगला व्हावा यासाठी मालिकेतील कलाकार नेहमीच खेळीमेळीचे वातावरण तयार करत असतात. स्क्रिप्ट वाचता न येणाऱ्या मायराला सोप्या पद्धतीने सिन समजावून सांगितला जातो. आणि तो तिच्यासमोर अभिनय स्वरूपात करूनही दाखवला जातो. यासाठी तिला श्रेयस तळपदे आणि प्रार्थनाची मदत नेहमीच मिळत असते. त्यामुळे अशा हलक्या फुलक्या वातावरणात मायराचा सिनही तसाच प्रभावी बनतो. सर्वांच्या लाडक्या मायरा आणि वायकुळ कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन.