Breaking News
Home / मालिका / मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेत्याला ओळखलंत?…या लोकप्रिय मालिकेतून साकारली होती प्रमुख भूमिका
ajinakya man udu lagle serial
ajinakya man udu lagle serial

मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेत्याला ओळखलंत?…या लोकप्रिय मालिकेतून साकारली होती प्रमुख भूमिका

झी मराठी वाहिनीवर लवकरच आणखी एक नवी मालिका दाखल होणार आहे. महेश कोठारे यांची निर्मिती असलेली ‘पाहिले न मी तुला’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे त्याजागी “मन उडू उडू झालं” ही नवी मालिका सुरू केली जात आहे. या मालिकेचं चित्रीकरण सध्या ठाण्याला केले जात आहे. येत्या ३० ऑगस्ट पासुन रात्री ७.३० वाजता झी मराठीवर मालिका प्रसारित केली जाणार आहे. मन उडू उडू झालं या नव्या मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी अक्षरशः लाईक्सचा पाऊस पाडला आहे. मालिकेच्या दोन्ही प्रोमोमध्येच मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. या नव्या मालिकेत अभिनेत्री “ऋता दुर्गुळे” मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

ajinkya raut actor
ajinkya raut actor

‘दुर्वा’ या मालिकेतून ऋता दुर्गुळे हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. झी युवा वाहिनीवरील फुलपाखरू या मालिकेतून तिने वैदेहीची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे ऋताला प्रसिद्धी मिळाली होती. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकातही ती झळकली. ऋता आता प्रथमच झी वाहिनीची मालिका साकारत आहे. ऋता सोबत झळकणाऱ्या या अभिनेत्याला देखील अनेकांनी ओळखलं असावं. ह्या अभिनेत्याचे नाव आहे “अजिंक्य राऊत”. महेश कोठारे यांच्या “विठुमाऊली” मालिकेतून विठ्ठलाच्या भूमिकेत अजिंक्य राऊत झळकला होता. या मालिकेसोबत टकाटक २ हा चित्रपट त्याने अभिनित केला आहे. अजिंक्य राऊत हा मूळचा परभणीचा. परभणीवरून आलेला हा मुलगा मॉडेलिंग क्षेत्रात आपले नशीब आजमावत होता. मॉडेलिंग करताकरता त्याला विठुमाऊली मालिकेत झळकण्याची संधी मिळाली होती. परभणीवरून आल्याने प्रथम त्याने आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळवले. लूकमध्ये चेंज केला. मधल्या काळात त्याने नृत्याचे धडे गिरवले आणि अगोदरपेक्षा अधिक हँडसम दिसण्यावर लक्ष केंद्रित केले.

ajinkya raut pahile na mi tula
ajinkya raut pahile na mi tula

झी मराठीवर येऊ घातलेल्या “मन उडू उडू झालं” या नव्या मालिकेत अजिंक्य राऊत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अजिंक्य राऊत आणि ऋता दुर्गुळे यांची केमिस्ट्री चांगली जुळणार हे मालिकेच्या प्रोमोमधूनच पाहायला मिळाले आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांची मने जिंकणार हे अगोदरच निश्चित झाले आहे. एक नवे कथानक घेऊन येणारे नव्या दमाचे हे कलाकार प्रेक्षकांची निराशा करणार नाहीत अशी आशा आहे. अनेकांना प्रश पडला होता कि ह्या मालिकेत हृता सोबत कोण अभिनेता असणार आता ह्या प्रश्नच निराकरण झालय असं म्हणायला हरकत नाही. विठूमाऊलीमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणारा अजिंक्य राऊत आता झी वाहिनीवरील ह्या नव्या मालिकेतही आपल्या अभिनयाची छाप नक्कीच पडेल ह्यात शंका नाही. “मन उडू उडू झालं” या मालिकेनिमित्त हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!….

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.