Breaking News
Home / मालिका / महेश कोठारे यांनी मागितली जाहीर माफी…अशी चूक पुन्हा कधीही होणार नाही
mahesh kothare
mahesh kothare

महेश कोठारे यांनी मागितली जाहीर माफी…अशी चूक पुन्हा कधीही होणार नाही

महेश कोठारे यांनी आजवर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. त्यांच्या बहुतेक मालिकांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला. त्यातीलच एक म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका, या मालिकेला देखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेलं पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतील गौरी आणि जयदीपच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे मात्र ही मालिका नुकतीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली पाहायला मिळत आहे. हा वाद नेमका कशामुळे झाला हे जाणून घेऊयात…

gauri shalini devaki mangalagaur
gauri shalini devaki mangalagaur

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या १४ सप्टेंबरच्या भागात त्यातील एका पात्राच्या ब्लाउजवर वंदनीय बुद्ध यांचे चित्र होते. त्यावरून अनेकांनी आमच्या भावना दुखावल्या असल्याने त्या पात्रावर आणि मालिकेच्या टीमवर आक्षेप नोंदवला गेला. तर या घटनेचा कडाडून विरोध देखील केलेला पाहायला मिळाला. या घटनेबद्दल नुकतेच महेश कोठारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर माफी मागितली आहे. याबाबत महेश कोठारे असेही म्हणाले की, मालिकेत सँडी विश्वास नावाचे पात्र आहे त्याने १४ सप्टेंबर च्या भागात गौतम बुद्ध यांचे चित्र असलेला ब्लाउज घातला होता. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत याबद्दल मी तुम्हा सर्वांची जाहीर मागतो. मला आमच्या संपूर्ण टीमला गौतम बुद्धाविषयी खूप आदर आहे. आमच्याकडून किंवा मालिकेच्या कुठल्याही टीम कडून पुन्हा अशी चूक होणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. आमच्या टीम तर्फे, युनिट तर्फे आणि मालिकेच्या कलाकारांतर्फे आज मी जाहीर पणे तुम्हा सर्वांची माफी मागतो आहे…असे महेश कोठारे या व्हिडिओद्वारे सांगतात.

sukh mhanje nakki kay asta
sukh mhanje nakki kay asta

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.