माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून दमदार अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहोचलेली माया अर्थात अभिनेत्री रुचिरा जाधव हिचे फोटो पुन्हा व्हायरल होत आहेत. तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अदांमुळे चाहते पुरते घायाळ झाले आहेत. रुचिराचा हा बोल्डनेस चाहत्यांना वेड लावल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. तिचे आकर्षक फोटो तसेच मजेशीर व्हिडीओ नेहमीच भुरळ घालत असतात. रुचिराचे फक्त बोल्ड मॉडर्न लूक फोटो नाही तर साडी मधील फोटो देखील नेहमीच व्हायरल होतात.
गुरुनाथ सुभेदारच्या प्रेमात पडलेली माया आणि बिझनेसचं अंगभूत कौशल्य याद्वारे तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना भावली. यापूर्वी रुचिराने लव्ह लफडे आणि सोबत या दोन चित्रपटात देखील काम केले आहे. मराठी वेब सिरीज माझ्या मित्राची गर्लफ्रेंड, एफओएमओ, बंच ऑफ रेड रोझेस यामध्येही विशेष भूमिका केली आहे. बाबू सिनेमात अभिनेत्री रूचिरा जाधव महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासाठी ती आगरी भाषा शिकत असल्याची चर्चा देखील खूप व्हायरल झाली होती. तिचे आकर्षक फोटो चाहत्यांना भुरळ घालणारे असतात. रुचिराचा जन्म दादर येथे झाला असून तिने शालेय शिक्षण पराग विद्यालय, भांडुप येथून केले. के जे सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स येथून जेनेटिक्स मध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन नाटकांमध्ये तिचा नेहमीच सहभाग असायचा.
सकाळ करंडक मध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट लेखिका असे पुरस्कार मिळाले होते. त्यामुळे पुढे अभिनय क्षेत्रातच करिअर करण्याचा तिने निर्णय घेतला. तुझ्या वाचून करमेना या मालिकेतून रुचिराने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने नुपूर सोमण हे पात्र साकारले. बे दुणे १०, माझे पती सौभाग्यवती आणि प्रेम हे अशा विविध मराठी मालिका मध्ये तिने वैशिष्ट्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. मनमोहक फोटो आणि व्हिडीओ सोबतच तिच्या दमदार भूमिकेसाठीही ती नेहमीच चर्चेत राहिली आहे.