मराठी बिग बॉसच्या घरात गेल्या १०० दिवसांच्या प्रवासाबद्दल जय दुधाने याने आपलं मत व्यक्त केलं आहे. जय दुधाने मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा रनरअप ठरला आहे. मी विजयाची ट्रॉफी जिंकावी असं मला मनापासून वाटत होतं असं तो म्हणाला. दरम्यान बिग बॉसच्या घरातील माझा प्रवास खूपच मजेशीर गेला आहे. मी स्प्लिट्सव्हीलाचा हिंदी रियालिटी शो गाजवला होता परंतु मला आपण ज्या राज्यात रहातो त्या मराठी सृष्टीशी मला जोडायचं होतं. म्हणून मी मराठी बिग बॉसच्या शोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मला बिग बॉसच्या शोमुळे खूप प्रसिद्धी मिळाली आहे.
ट्विटरवर तर मी खूप ट्रेंड मध्ये आलो होतो. अख्या भारतातील लोकांना मराठी बिग बॉसचा शो माहीत झाला होता. पुढे हिंदी बिग बॉसमध्ये जाण्याचा विचार मी नक्की करेन, असेही तो म्हणतो. बिग बॉसच्या घरात स्नेहा परतली होती तेव्हा तीने जयवर आरोप लावले होते की, आपल्या मागून आपलेच मित्र एवढी इज्जत नाही काढत. हे आरोप होत असताना स्नेहाने जय सोबत बोलणे देखील बंद केले होते. अजूनही आम्ही पहिल्या सारखे बोलत नाहीत, अशी खंत जयने व्यक्त केली आहे. मात्र आता बिग बॉसच्या घराबाहेर पडलो आहे, तर मी नक्कीच तिची भेट घेणार आहे. आणि तिचा अबोला दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे जय आवर्जून सांगतो. बिग बॉसच्या घरातील सदस्यांबाबत एका शब्दात सांगायचं झालं तर तृप्ती देसाई या कडक ताई आहेत.
तर अविष्कार कलिंगड आहे, सोनाली तडका, मीरा केअरिंग, विशाल देवमाणूस, विकास बडबड्या, उत्कर्ष बडे भैय्या. गायत्री चंगू कारण आमची दोघांची चंगू मंगू ची जोडी आहे, तर स्नेहा गुलाब आहे. बिग बॉसच्या घरात जे काही वाद झाले ते फक्त घराच्या आतच होते. आणि आता आम्ही सगळे जण बाहेर आलो आहोत, त्यामुळे आमच्यात कायम चांगली मैत्री असणार आहे. जे प्रेक्षक माझ्यावर नाराज होते त्या प्रेक्षकांची देखील मी मनं जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे असे जय म्हणतो. दरम्यान जय दुधाने बिग बॉसच्या शोचा रनर अप ठरला असला तरी, त्याला महेश मांजरेकर यांनी चित्रपटाची ऑफर देऊ केली आहे. त्यामुळे हा शो जिंकला नसला तरी चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकेल.