Breaking News
Home / जरा हटके / या महान माणसाच्या कृतीनं खरंच लै जनांच्या सनसनीत कानफाडीत मारलेली हाय..
ratan tata birthday kiran mane
ratan tata birthday kiran mane

या महान माणसाच्या कृतीनं खरंच लै जनांच्या सनसनीत कानफाडीत मारलेली हाय..

महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विलास पाटील अर्थात अभिनेता किरण माने पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. यावेळचा विषय खूपच हटके आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी आपला वाढदिवसानिमित्त अतिशय साधेपणाने साजरा केला. हा व्हिडीओ खूपच बोलका आणि कानउघडणी करणारा असून, बडेजाव करणाऱ्या भल्याभल्या मंडळींना चपराक देणारा ठरला आहे. टाटा उद्योग समूहाच्या १० उद्योग क्षेत्रातील तब्ब्ल ८ लाख लोकांना रोजगार देणाऱ्या एकूण ३० कंपन्या, भारतीय मनावर अधिराज्य गाजवीत आहेत. कुठलाही गाजावाजा न करता अतिशय साधेपणाने केले जाणारे सामाजिक देशहित कार्य देखील वाखाणन्याजोगो आहे. वाढदिवसाच्या नावाखाली अन्नाची हेळसांड करणाऱ्यांना समर्पक पद्धतीने आपल्या रांगड्या शैलीत किरण यांनी अतिशय सुरेख मांडला आहे.

ratan tata birthday kiran mane
ratan tata birthday kiran mane

किरण म्हणतात.. खरंय खरंय, या महान माणसाच्या या कृतीनं खरंच लै जनांच्या सनसनीत कानफाडीत मारलेली हाय या ठिकानी ! परवाच माझ्या एका मित्रानं त्याच्या शुटिंग सेटवरच्या प्राॅडक्शन कंट्रोलरचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. “किरण, आम्ही कस्लं एंजाॅय केलं बघ.” म्हन्ला चाळीस बेचाळीस केक आणून त्यात बचाबचा हात बुडवून एकमेकांच्या तोंडावर थापन्याची अक्षरश: रंगपंचमी चालली होती ! सगळ्या परीसरात पडणारा केकचा सडा. मूठमूठभर क्रीम हात घेऊन एकमेकांमागे चाललेली पळापळी. केकची फेकाफेकी बघून संताप येत होता. बरं, ज्याचा वाढदिवस साजरा होत होता, त्याचं कर्तृत्व, त्याची लायकी, त्याचं ‘कॅरॅक्टर’, त्याची नैतीकता अशी आहे की त्याची वाढदिवसादिवशी खेटरानं पूजा केली तरी कमी हाय ! त्याचवेळी एका गल्लीतल्या एका सडकछाप गावगुंडानं तलवारीनं केक कापल्याचा एक फोटो बघूनबी संताप येत होता. असो, आपन या व्हीडीओबद्दल बोलूया.

ratan tata 84th birthday celebration
ratan tata 84th birthday celebration

यात दिसनारा ह्यो मानूस साधासुधा नाय. ह्यानं चाळीस कोटी केक कापले तरी कमीच हाय यवढं याचं काम हाय. ‘टाटा उद्योगसमूहाला’ नवी दिशा देनार्‍या या मानसाचा ‘साधेपना’ भल्याभल्यांना थक्क करनारा हाय भावांनो. ल्हानपनीपास्नंच यानं ‘आपन जमशेदजी टाटा यांचे नातू आहोत’ असा आव आनला नाय. ‘टाटा’ हे आपलं फक्त आडनांव हाय, आपन आपल्या सोत्ताच्या बळावर उभं र्‍हायचं या विचारानं झपाटलेला ह्यो गडी ! आर्किटेक्ट होन्यासाठी जवा अमेरीकेला गेला तवा तिथं शिक्षन आनि उमेदवारीच्या दहा वर्षांत या अवलीयानं हाटेलात भांडी घासन्यापास्नं, कारकुनाच्या नोकरीपर्यंत जे जमंल ते केलं ! परत आल्यावर ‘टाटा समूहा’त दाखल व्हायच्या आधी जमशेदपूरच्या ‘टाटा स्टील’मध्ये या पठ्ठ्यानं कोळशाची पोती पाठीवरनं वहान्यापास्नं ते धगधगत्या भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच कंपनीची धूरा हातात घेतली.

त्यानंतर त्यानं काय केलं ते मी हितं सांगायची गरजच नाय. नेल्को वर आनन्यापास्नं ते जग्वार आन् लॅंडरोव्हर इकत घेन्यापर्यन्तचा इतीहास भुगोल जगाला म्हायतीय. बापजाद्यांची एकेक प्राॅपर्टी इकून थयाथया नाचनार्‍या भुरट्यांची सद्दी असताना, आधीपास्नं असलेल्यात भर घालून नव्या भरीव गोष्टी इकत घेनारा ह्यो मानूस मोलाचा ठरतो तो यासाठीच. तर सांगायचा मुद्दा ह्यो की, कालच या मानसानं वयाचा ८४ वा बर्थ डे असा साजरा केला! हे पाहुन, या ठिकानी आपन सगळ्यांनी सोत्ताला एक मुस्काडात नाय मारून घेतली तरी हरकत नाय. पन यातनं कायतरी शिकूया, हीच अपेक्षा ! कडकडीत सलाम रतन टाटा लब्यू❤️, किरण माने.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.