Breaking News
Home / मालिका / बिग बॉसच्या घरातील हा स्पर्धक ठरला पहिला फायनलिस्ट
meenal shah finalist big boss marathi
meenal shah finalist big boss marathi

बिग बॉसच्या घरातील हा स्पर्धक ठरला पहिला फायनलिस्ट

बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात स्नेहा वाघ, तृप्ती देसाई आणि आदिश वैद्य यांनी पुन्हा एकदा एन्ट्री घेतली. घरात दाखल होताच स्नेहाने जयवर निशाणा साधला होता. आपल्या मागून आपलेच मित्र इज्जत नाही काढत असे म्हणत तिने जयवर आरोप लावले होते. स्नेहाचा कुठेतरी गैरसमज झालाय पण ती आपल्याशी बोलत नाही, हे पाहून जय खूपच दुःखी झाला होता. एवढेच नाही तर त्याने आपल्या हाताला दुखापत देखील करून घेतली होती. जयच्या अशा वागण्यावर स्नेहाने मात्र नमते घेण्याचे ठरवले, मात्र घरातील कोणताच सदस्य मला चांगला ओळखत नाही. सगळेच जण मागून नाव ठेवतात पण यातलं मला कोणीच ओळखत नाही असे ती जय सोबत बोलताना दिसली.

meenal shah finalist big boss marathi
meenal shah finalist big boss marathi

ह्या आठवड्यात स्नेहा, तृप्ती आणि आदिश यांनी घरातील सदस्यांना वेगवेगळे टास्क दिले होते. हे टास्क पूर्ण करत असताना घरातील सदस्यांची मात्र पुरती तारांबळ उडालेली पहायला मिळाली. तर मनात नसताना ही जयला मात्र आदिश वैद्यने दिलेल्या आदेशानुसार त्याचे पाय साफ करायला लावले. गेल्या आठवड्यात नॉमिनेट होण्यापासून सर्वच सदस्य वाचले होते. त्यामुळे मीरा, सोनाली, जय, मीनल, विकास , गायत्री, विशाल आणि उत्कर्ष हे आठही सदस्य ह्या आठवड्यात पुन्हा एकदा नॉमीनेशनच्या प्रक्रियेला तोंड देताना दिसत आहेत. आजच्या भागात कॅप्टनसीच्या टास्कमध्ये कोण बाजी मारणार हे पाहायला मिळणार आहे, मात्र त्यागोदरच घरातील एक सदस्य फायनलमध्ये गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मीनल शाह ह्या आठवड्यात कॅप्टन पदासाठी पात्र झाली आहे. त्यामुळे नॉमिनेशन प्रक्रियेतून ती बाहेर पडली आहे. याचाच अर्थ बिग बॉसची फायनिस्ट बनण्याचा मान तिला मिळाला आहे. मीनल ही पहिली सदस्य आहे जिने मराठी बिग बॉसच्या ३ऱ्या सिजनच्या फायनल मध्ये आपलं नाव नोंदवलं.

vishhal nikam jay dudhane captaincy task
vishhal nikam jay dudhane captaincy task

मीनल फायनलमध्ये पोहोचली असल्याचे समजताच तिच्या चाहत्यांमध्ये आता प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मीनलची आई मराठी तर तिचे वडील गुजराती, परंतु आई वडील दोघेही विभक्त झाल्यानंतर तिच्या आईनेच मीनल आणि तिच्या भावाचा सांभाळ केला होता. त्यामुळे मी मराठीच आहे असे मीनल आपल्या बोलण्यातून नेहमी सांगताना दिसते. एमटीव्ही रोडीज सारख्या शोमध्ये मिनलने सहभाग घेतला, या शोमध्ये देखील देण्यात येणारे टास्क मिनलने मोठ्या धाडसाने पूर्ण केले होते. या शोमुळे मिनलला खूप प्रसिद्धी मिळाली होती आणि आता मराठी बिग बॉसच्या शोमुळे देखील ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. अर्थात बिग बॉसच्या घरात देखील दिलेले टास्क खूप चांगले खेळले होते आणि एक स्ट्राँग कंटेस्टंट म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. मीनल फायनलपर्यंत जाणार असे सुरुवातीपासूनच बोलले जात होते आणि तेच आता प्रेक्षकांना प्रत्यक्षात पाहायला देखील मिळत आहे.

sneha wagh adish vaidya
sneha wagh adish vaidya

मीनल सोबत आणखी कोणकोणते सदस्य फायनलमध्ये जातील याची उत्सुकता आहे. त्यात बऱ्याचदा जय, विशाल, विकास आणि सोनाली असतील असा अंदाज अनेकांनी बांधला आहे. बिग बॉसच्या चावडीवर ह्याचा उलगडा लवकरच होईल पण त्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. मीनल फायनलमध्ये पोहोचली असल्याने तिचे मनापासून अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.