Breaking News
Home / मराठी तडका / या अभिनेत्याचं अभिनेत्रीशी झालं लग्न.. मालिकेतील कलाकारांनी लावली हजेरी
actress mrudula kulkarni wedding
actress mrudula kulkarni wedding

या अभिनेत्याचं अभिनेत्रीशी झालं लग्न.. मालिकेतील कलाकारांनी लावली हजेरी

स्टार प्रवाह वाहिनीवर ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत शशांक आणि अपूर्वाची लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. बिनधास्त अपूर्वा आणि समजूतदार शशांक यांची नोकझोक मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि आता हे दोघे कधी लग्न करणार याची उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत चेतन वडनेरे आणि ज्ञानदा रामतीर्थकर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. या दोघांची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना हवीहवीशी वाटू लागली आहे.

actress mrudula kulkarni wedding
actress mrudula kulkarni wedding

त्यासोबतच शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, मंगेश कदम, लीना भागवत, अतुल तोडणकर, शीतल कुलकर्णी, सारिका निलाटकर, स्वप्नील काळे, अमृता फडके, श्रीकांत भिडे या मातब्बर कलाकारांची साथ मालिकेला लाभली आहे. मालिकेत अपूर्वाने केलेली मदत कानिटकर कुटुंबाला संकटातून मुक्त करताना दिसली त्यामुळे अपूर्वा आणि शशांकचे लग्न जुळवण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न केले जाणार आहेत. शशांक आणि अपूर्वा यांचे लग्न जुळण्याअगोदर मात्र खऱ्या आयुष्यात या मालिकेतील एका कलाकाराचे नुकतेच लग्न झालं आहे. या मालिकेत अमेय कानिटकर पात्र साकारणारा अभिनेता स्वप्नील काळे नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. अभिनेता स्वप्नील काळे हा मराठी चित्रपट, मालिका तसेच नाट्य अभिनेता आहे. बी टेकची पदवी मिळवलेल्या स्वप्नीलने नाट्यस्पर्धांमध्ये सहभाग दर्शवला होता. नाट्यस्पर्धां, एकांकिका साकारत असताना त्याला चित्रपटात नायकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. ‘काय झालं कळंना’ या चित्रपटात अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि स्वप्नील काळे मुख्य भूमिकेत झळकले होते.

swapnil kale mrudula kulkarni wedding photos
swapnil kale mrudula kulkarni wedding photos

आम्ही बेफिकर, छावणी हे चित्रपट त्याने अभिनित केले आहेत. याशिवाय अस्सं सासर सुरेख बाई, वर्तुळ या मालिकेतून तो प्रेक्षकांसमोर आला होता. अभिनेता स्वप्नील काळे मृदुला कुलकर्णी सोबत नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. त्याची पत्नी मृदुला कुलकर्णी ही देखील अभिनेत्री आहे. सध्या सोनी मराठी वाहिनीवरील गाथा नवनाथांची या मालिकेतून ती महत्वाची भूमिका साकारत आहे. क्रिमीनल्स चाहूल गुन्हेगारांची, राजाला जावई हवा, यदाकदाचित, प्रेम करावं पण जपून, नवे लक्ष्य, सोन्याची पावलं, आम्ही पाचपुते अशा नाटक आणि टीव्ही मालिकांमधून मृदुला छोट्या मोठ्या अशा वैविध्यपूर्ण भूमिकेत पाहायला मिळाली. मृदुला आणि स्वप्नील यांच्या थाटात पार पडलेल्या लग्न सोहळ्यात ठिपक्यांची रांगोळी ता मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावून त्या दोघांना शुभेच्छा दिल्या होत्या. सुप्रिया पाठारे, शीतल कुलकर्णी हे मालिकेतील सहकलाकार त्यांच्या लग्नाला उपस्थित राहिले होते.

swapnil mrudula wedding
swapnil mrudula wedding

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.