बिग बॉस हिंदी सीजन १५ सध्या अंतिम टप्प्यात चर्चेचा विषय ठरतोय. सलमान खानचा हा सिझन टीआरपीच्या बाबतीत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. निर्मात्यांनी या शोमध्ये रंगत आणण्यासाठी जीवतोड मेहनत घेताना दिसून येत आहे. टीआरपी वाढवण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली होती. परंतु शो च्या लोकप्रियतेवर याचा काहीच परिणाम पाहायला मिळाला नाही. बऱ्याच खटाटोपी नंतर आता निर्मात्यांनी या शो बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
बिग बॉस सीजन १५ चा अंतिम सामना जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडणार होता. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, निर्मात्यांनी या स्पर्धेची अंतिम तारीख १६ जानेवारी ठरवली होती. परंतु आता ही स्पर्धा २ आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. याशिवाय शो मधील विकेंड का वार टायमिंग देखील रात्री ९ वाजताचा करण्यात आला आहे. अधिकची वेळ आणि नवीन कॅप्टन्सी टास्क मुळे आणखी काही स्पर्धक घराच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. या स्पर्धेचा अंतिम सामना ३० जानेवारी रोजी रंगणार आहे. फिनाले जवळ आल्यामुळे अंतिम स्पर्धेपूर्वी बिग बॉस सदस्यांना अनेक मजेदार टास्क देणार आहेत. त्यामुळे खेळातील चुरस आणखी वाढणार आहे.
आता या स्पर्धेचा अंतिम सामन्यात कोण कोण असेल हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या टॉप ३ स्पर्धकांमध्ये करण कुंद्रा आणि प्रतीक सहजपाल नक्कीच असू शकतात. प्रतीक सहजपाल हा सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय ठरत आला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना होण्यापूर्वीच चाहत्यांनी त्याला विजेता घोषित केले आहे. तर दुसरीकडे करण कुंद्रा देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याचे देखील लाखो फॉलोवर्स आहेत. आजवरच्या एकंदरीत प्रवासावरून प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की, करण कुंद्राने बिग बॉस सीजन १५ चे जेतेपद मिळवावे. आता जेतेपद कोण मिळवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.