मराठी बिग बॉसचा तिसरा सिजन लवकरच एक्झिट घेणार आहे. त्यामुळे ह्या सिजनचा विजेता कोण असणार, हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे. बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात टॉप सहा असलेल्या सर्वच सदस्यांचे बिग बॉसने कौतुक केले आहे. त्यात विशेष म्हणजे कुठलाही आरडाओरडा न करता उत्कर्षणे दिलेले टास्क पूर्ण केले होते. त्यामुळे आजवरच्या सीजनमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून उत्कर्ष शिंदेला सन्मानित करण्यात आले. तर मीनल, मीरा, जय, विकास, विशाल हे सदस्य देखील बिग बॉसने केलेल्या कौतुकाने भारावून गेले आहेत. विकासने विशालसाठी दिलेला त्याग खूप मोठा होता. असेही बिग बॉस विकासचे कौतुक करताना म्हटले. बिग बॉसच्या घरात आता ६ स्पर्धक राहिले आहेत त्यातील विशाल निकम हा एकच सदस्य असा आहे जो फायनलमध्ये पोहोचला आहे.

बिग बॉसच्या फायनलमध्ये ५ सदस्य राहण्यासाठी आता एका सदस्याची एक्झिट करावी लागणार आहे. आज बिग बॉसच्या घरातून एका सदस्याला एलिमीनेट व्हावे लागणार आहे. बिग बॉसच्या सिजनचा हा शेवटचा एलिमीनेशन राउंड असणार आहे. या एलिमीनेशन राउंडमधून बाहेर पडण्यासाठी बिग बॉसने पाचही सदस्यांना गार्डन एरियात बोलावले आहे. तिथे एका पटावर ह्या पाचही सदस्यांना उभे राहावे लागणार आहे. त्यातुन एक स्पर्धक बाद केला जाणार आहे, जो एलिमीनेट होऊन बिग बॉसच्या घरातून आज बाहेर पडेल असे वाटते. आजवरच्या एकंदरीत खेळावर प्रेक्षकांनी सर्वांना भरभरून सपोर्ट केला आहे. आज शेवटच्या एलिमीनेशनमधून मीरा जगन्नाथला घराबाहेर पडावे लागणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विशाल सह आता विकास, जय, उत्कर्ष, मीनल हे चार सदस्य फायनलमध्ये पोहोचले असल्याचे स्पष्ट होईल.

मीरा जगन्नाथ खूप अगोदरच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडायला हवी होती, अशी प्रतिक्रिया तिच्याबाबत नेहमीच देण्यात आली होती. मिराला जास्त मतं मिळाली नव्हती तरीदेखील तिला एलिमीनेट होऊनही महेश मांजरेकर यांनी तिला सेफ केलं होतं. त्यामुळे काही प्रेक्षक नाराज झाले होते. तिच्यामुळे सोनालीला देखील घराबाहेर पडावे लागले असे मत तिच्याविरोधात प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाले. बिग बॉसच्या घरात शेवटच्या एलिमीनेशन मधून बाद करण्यात आले असून मीरा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार आहे. त्यामुळे तिचा फायनलमध्ये जाण्याचा प्रवास आता इथेच संपला आहे. रविवारी विशेष भागात बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता घोषित करण्यात येणार आहे. विशाल, मीनल, विकास, उत्कर्ष आणि जय या पाच सदस्यांमध्ये कोणता सदस्य विजेता होणार याची प्रेक्षक आता वाट पाहत आहेत.