प्रेक्षकांचे निखळ मनसोक्त मनोरंजन करणारा आता होऊ द्या धिंगाणा रिऍलिटी शो स्टार प्रवाहचे खास आकर्षण ठरू लागला आहे. अनोख्या धाटणीचा शो, धमाल मजा मस्ती आणि तितक्याच चुरशीच्या खेळांमधून मनोरंजन होताना दिसत आहे. झी मराठी स्टार प्रवाह वाहिनी मधील टीआरपीची रस्सीखेच नवनवीन मालिकांमुळे नेहमीच वाढत चालली आहे. झी मराठी वरील किचन कल्लाकार, बँड बाजा वरात, बस बाई बस या रिऍलिटी शोची जादू प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसली. मालिका, चित्रपटां व्यतिरिक्त आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी; या रिऍलिटी शोला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दाखविला.
दिवाळी निमित्त आता होऊ द्या धिंगाणाच्या मंचावर मालिका विश्वातील कलाकार धम्माल मस्ती करताना दिसत आहेत. आई कुठे काय करते, ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, लग्नाची बेडी, तुझेच मी गीत गात आहे तसेच सुख म्हणजे नक्की काय असतं, पिंकीचा विजय असो. या मालिकां मधील हँडसम अभिनेते विरुद्ध गॉर्जिअस अभिनेत्री असा सामना रंगतदार ठरत आहे. यात आणखी भर म्हणून सिद्धार्थ जाधवचे सूत्रसंचालन सर्वांना वेगळी ऊर्जा देऊन जाते. आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर सिद्धार्थचा आई वडिलांच्या उपस्थितीत धिंगाणेबाज वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. एकीकडे ज्ञानदा रामतीर्थकर, सायली देवधर, रेश्मा शिंदे, गिरीजा प्रभू, रुपाली भोसले, प्रिया मराठे, शरयू सोनवणे.
तर चेतन वडनेरे, अशुतोष गोखले, मंदार जाधव, मिलिंद गवळी, संकेत पाठक, अभिजित खांकडेकर, विजय आंदळकर असा सामना रंगला आहे. शो मध्ये धिंगाणा करत अभिजित खांडकेकर सर्वांना उद्देशून म्हणतो कि, आम्ही भारीच आहोत, पण या ज्या काही मिणमिणत्या पणत्या आहेत, यांना आमच्या समोर उभं राहण्याचं धाडस दाखवता आलं. यासाठी आम्हा सर्वांकडून यांना रॉयल सॅल्यूट द्यायचा आहे. यावर सर्वजण खास शैलीत अभिनेत्रींना चिडवतात कि, धिंगाणा घालायला आम्ही आहोत बांधील, आज इथे उजळणार कडकडीत कंदील. यामुळे दिवाळी निमित्त हा सामना आणखीनच रंगतदार होणार असे स्पष्ट दिसत आहे. चुणचुणीत पणत्या की कडकडीत कंदील बाजी मारणार हे पाहायला विसरू नका.