Breaking News
Home / मालिका / जय भवानी जय शिवाजी मालिकेतून ही अभिनेत्री साकारणार सोयराबाईंची भूमिका
urmila jagtap
urmila jagtap

जय भवानी जय शिवाजी मालिकेतून ही अभिनेत्री साकारणार सोयराबाईंची भूमिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील जय भवानी जय शिवाजी या ऐतिहासिक मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजवर छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक मालिका टीव्ही माध्यमातून प्रेक्षकांसमोर आल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिका देखील अनेक कलाकारांनी साकारलेल्या पाहायला मिळाल्या. जय भवानी जय शिवाजी या मालिकेतून भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर अजिंक्य देव यांनी बाजी प्रभू देशपांडे, कश्यप परुळेकर यांनी नेताजी पालकर तर विशाल निकम याने शिवा काशीद निभावला आहे. मालिकेतून छत्रपतींच्या शिलेदारांच्या ऐतिहासिक घटनांवर प्रकाश टाकलेला पाहायला मिळतो त्यामुळे शिलेदारांच्या भूमिकांना या मालिकेतून चांगला वाव मिळताना दिसत आहे.

urmila jagtap
urmila jagtap

आजपासून या मालिकेत सोयराबाईंची व्यक्तिरेखा दाखल होणार आहे ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे “उर्मिला जगताप”. उर्मिला जगताप ही अभिनेत्री तसेच मॉडेल देखील आहे. झी मराठीवरील घेतला वसा टाकू नको या मालिकेतून तिला अभिनयाची संधी मिळाली होती. चिर्रर्रर्र बुंगाट, अंधार सावलीचा, गजरा, ओढणी अशा काही गीतातून ती प्रेक्षकांसमोर आली होती. फक्त मराठी वाहिनीवरील स्पेशल पोलीस फोर्स मालिकेतून तीने महिला पोलीस, उत्तुंग मराठी शोमध्ये तिने संदीप पाठक सोबत काम केले आहे. उर्मिला प्रेक्षक जल्लोष ची ब्रँड आंब्यासिडर म्हणूनही ओळखली जाते. उर्मिला ही पुण्यातील हडपसर परिसरात राहत आहे. लवकर लग्न होऊ नये म्हणून तिने सीएची परीक्षा देण्याचे ठरवले होते मात्र पहिल्याच दिवशी मोठा अपघात झाल्याने तिला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले होते. या अपघातातून नीट झाल्यावर तिने स्किन स्पेशलिस्ट डॉक्टरकडे रिसेप्शनीस्टची नोकरी केली होती.

urmila jagtap as soyarabai
urmila jagtap as soyarabai

दरम्यान अभिनय क्षेत्रात येण्यासाठी ती धडपड देखील करत होती. अखेर तिला मधुर भांडारकर यांच्या ‘इंदू सरकार’ चित्रपटातून ज्युनिअर आर्टिस्टचे काम मिळाले. त्यानंतर सुमीत कंपनीच्या अल्बममधून तिला थोडीफार प्रसिद्धी मिळाली. प्रेक्षक जल्लोष या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्याची नामी संधी तिला मिळाली. या कार्यक्रमाची तीला ब्रँड आंब्यासिडर म्हणून ओळख मिळाली. हा प्रवास सुरु असताना आता स्टार प्रवाह वाहिनीवरील जय भवानी जय शिवाजी मालिकेतून ती सोयराबाईंची भूमिका साकारताना दिसणार आहे. या दमदार भूमिकेबाबत उर्मिला जगताप फारच उत्सुक असलेली पाहायला मिळत आहे.

beautiful urmila jagtap
beautiful urmila jagtap

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.