Breaking News
Home / बॉलिवूड / अभिनेते सचिन पिळगांवकर करणार होते बॉलिवूडच्या ह्या सुंदर अभिनेत्रीशी लग्न
sachin pilgaonkar and sarika thakur
sachin pilgaonkar and sarika thakur

अभिनेते सचिन पिळगांवकर करणार होते बॉलिवूडच्या ह्या सुंदर अभिनेत्रीशी लग्न

​​आज तुम्हाला अशा एका अभिनेत्रीची ओळख करून द्यायची आहे जिने आपल्या बालवयापासूनच अतोनात हालअपेष्टा सहन केल्या. ३ जून १९६२ रोजी दिल्ली येथील मराठी – हिमाचल कुटुंबात सारिका ठाकूर या अभिनेत्रीचा जन्म झाला. सारिका लहान असताना वडील घर सोडून निघून गेले होते. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका मिळाली. घाऱ्या डोळ्याची चुणचुणीत सुंदर मुलगी पण पहिले काम मिळाले मुलाच्या भूमिकेचे, ‘मास्टर सूरज’ अशी मुलाची भूमिका ​तिने लीलया साकारली. आयुष्याच्या सुरुवातीलाच ब्रेक मिळाला खरा पण आयुष्यातील पुढील प्रवास फारसा सोपा नव्हता..

sachin pilgaonkar and sarika thakur
sachin pilgaonkar and sarika thakur

मास्टर सुरजच्या भूमिकेमुळे इंडस्ट्रीमध्ये थोडे नाव झाले होते, छोटी बहू, बडे दिलवाला, अकलमंद, रझिया सुल्तान अशा अनेक चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारून एका आघाडीच्या नाईकांमध्ये आपले नाव कोरले. चित्रपटात काम करून मिळालेला पैसा तिची आई कमल ठाकूर कडे सुपूर्द करत. एवढेच नाही तर अगदी प्रॉपर्टी, घरदार सर्व आईच्याच नावे तिने करून दिले होते. सारिका आणि सुपरस्टार सचिन पिळगावकर सोबत गीत गाता चल, जान ए बहार, मधू मालती, रक्षाबंधन, जाये तो जाये कहा सारख्या तब्बल १२ चित्रपटात एकत्रित काम केले. चित्रपटातील त्यांच्या जोडीला विशेष पसंती देखील मिळाली. ह्याचाच परिणाम म्हणून त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. दोघेही एकमेकांना पसंत असताना लग्न करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले. परंतु सारिकाच्या आईला हे लग्न मान्य नव्हते. लग्नानंतर सारिकाचे करिअर संपुष्टात येण्याच्या भीतीने त्यांनी या लग्नाला विरोध केला होता, त्यानंतर सारिका मनातून पूर्णपणे खचून गेली. त्यानंतर सचिन यांचे प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया यांच्यासोबत लग्न झाले..

sachin supriya and sarika
sachin supriya and sarika

काही वर्षांनी निराश सारिका मुंबई सोडून मद्रासला निघून गेली. तिथे आपला जम बसवत असताना दाक्षिणात्य सुपरस्टार “कमल हसन” सोबत तिची मैत्री झाली. या मैत्रीचे प्रेमात आणि पुढे लग्नात रूपांतर झाले. १९८८ साली सारिका आणि कमल हसन लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नाआधीच सारिकाने मुलगी श्रुती हिला जन्म दिला असल्याचे सांगितले जाते. श्रुती हसन दाक्षिणात्य चित्रपटातील टॉपची अभिनेत्री म्हणून नाव कमवत आहे. श्रुती आणि अक्षरा ह्यांच्या जन्मानंतरही सारिकाने चित्रपट क्षेत्रात आपले काम चालूच ठेवले. सुमारे दोन दशके हा सुखी संसार चालला होता पण पुन्हा अघटित घडले.. २००४ साली सारिका आणि कमल हसन ह्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यावेळी आपल्या दोन्ही मुलींनी वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने सारिका पुन्हा एकटी झाली. चेहऱ्यावरील खोटे हसू दाखवत मनातील खचलेल्या भावना ती लपवू शकत नव्हती. मुंबईत येऊन नव्या उमेदीने तिने याच क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.

sachin and sarika movie scene
sachin and sarika movie scene

कॉस्टयूम डिझायनर, साउंड डिझायनर अँड असिस्टंट म्हणून तिने अनेक भूमिका पार पाडल्या. परंतु नियतीने तिच्या पुढ्यात भलतेच लिहून ठेवले होते, सारिकाने मुंबईत घेतलेले घर देखील आईच्या नावाने खरेदी केलेले होते. सारिकाला सर्व हक्कांपासून बेदखल करत हा फ्लॅट तिच्या आईने परस्पर देऊन टाकला. मध्यंतरी सारिकाला भाड्याने राहावे लागल्याच्या बातम्या देखील पसरत होत्या. प्रसिद्ध अभिनेत्री आणि मुलाखतकार तबसुम ही सारिकाची जिवलग मैत्रिण, त्यांनीच एका मुलाखतीत सारिकाच्या आयुष्याबाबत हा खुलासा केला. एवढ्या कठीण परिस्थितीत देखील तिचा संघर्ष अजून थांबलेला नसल्याची त्यांनी आठवण करून दिली. खरं तर आई आपल्या मुलांच्या सुखासाठी काहीही करायला तयार असते. परंतु सारिकाची आई त्याला अपवाद म्हणावी लागेल. मृत्यूनंतर ही या आईने संपत्ती पासून बेदखल करत आपल्या मुलीला कुठल्याच आधाराशिवाय कायमचे एकाकी राहण्यास भाग पाडले.

gorgeous sarika thakur
gorgeous sarika thakur

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.