Breaking News
Home / बॉलिवूड / तुमच्या प्रार्थनेची गरज आहे.. ९ लाखांची बॅग घेऊन बाहेर पडताच राखीला बसला धक्का
rakhi sawant
rakhi sawant

तुमच्या प्रार्थनेची गरज आहे.. ९ लाखांची बॅग घेऊन बाहेर पडताच राखीला बसला धक्का

मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड फिनाले सोहळा काल मोठ्या थाटात पार पडला. टॉप पाचच्या यादीत राखी सावंत हिने आपले स्थान निश्चित केले असतानाच काल ९ लाखांची बॅग घेऊन ती स्पर्धेतून बाहेर पडली. राखीने मराठी बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याऐवजी ९ लाखांची बॅग घेऊन समाधान मानले. तिचा हा निर्णय अनेकांना पटला देखील, त्यामुळे प्रेक्षकांनी राखीवर कौतुकाचा वर्षाव केला होता. मात्र आता बिग बॉसच्या शोमधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंतला वाईट बातमी समजली आहे. मला ह्या घरात असताना कोणीच कसं सांगितलं नाही? हा प्रश्न देखील तिला सतावत आहे.

rakhi sawant
rakhi sawant

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखीला आता समजले आहे की तिच्या आईची प्रकृती अत्यंत चिंताजनक झालेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राखीची आई कॅन्सरच्या गंभीर आजाराला तोंड देत आहे. त्यासाठी तिने सलमान खानची देखील मदत घेतली होती. मात्र आता तिच्या आईची तब्येत खालावल्यामुळे तुमच्या प्रार्थनेची गरज आहे असे राखीने केलेल्या एका व्हिडिओत सांगत आहे. राखीच्या आईला ब्रेन ट्युमर आहे आणि त्यातच कॅन्सरने ग्रासले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सुद्धा चिंता व्यक्त केली आहे. आईची ही अवस्था पाहून राखीला आता आपले अश्रू अनावर होत आहेत. मी बिग बॉसच्या घरात होते तेव्हा मला कोणीही याची कल्पना दिली नाही ही खंत तिने बोलून दाखवली आहे. राखीच्या आईंना टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

rakhi sawant salman khan
rakhi sawant salman khan

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिच्या आईच्या ब्रेन ट्युमरमधील काही सेल्स तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. रिपोर्ट शुक्रवारपर्यंत मिळतील, मात्र आता हा कॅन्सर फुफ्फुसांपर्यंत पोहोचला असल्याने त्यावर कुठलेही ऑपरेशन करता येणे सध्यातरी अशक्य आहे. मात्र रिपोर्ट येईपर्यंत आम्ही त्याबाबत योग्य ती काळजी घेत आहोत असे आश्वासन तिला डॉक्टरांनी दिले आहे. बिग बॉसच्या घरात असताना राखीने तिच्या आईच्या आजारपणाबाबत उलगडा केला होता. सगळ्या सदस्यांचे फॅमिली मेम्बर त्यांना भेटायला येतात. मला ह्या घरात कोणीच भेटायला आलं नाही अशी खंत ती व्यक्त करत होती. आई बऱ्याच वर्षांपासून आजारीच असते, त्यामुळे ती केवळ टीव्हीच्या माध्यमातूनच मला भेटते असे ती म्हणाली होती.

मात्र त्यानंतर राखीचा बॉयफ्रेंड आदिलने बिग बॉसच्या घरात हजेरी लावून मराठी अंदाजात तिला प्रपोज केले होते. राखीला फुल्ल इंटरटेनर आहे, मात्र खेदाची बाब म्हणजे ती या मनोरंजनामागे स्वतःचे दुःख लपवत आहे. आईच्या उपचारासाठी राखी वाटेल ते करायला तयार असते. त्याचमुळे सलमान खान कडून ती यासाठी मदत घेत असते. आणि सलमानने देखील राखीला अनेकदा काम मिळवून दिले आहे. तर तिच्या आईच्या उपचारासाठी देखील पुढाकार घेतला आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.