Breaking News
Home / जरा हटके / ​’ठासून जावा त्यांची ज्यांना वाटत होतं’.. प्रदीप खरेराच्या रडणाऱ्या व्हिडीओवर मानसी नाईकची खरमरीत प्रतिक्रिया

​’ठासून जावा त्यांची ज्यांना वाटत होतं’.. प्रदीप खरेराच्या रडणाऱ्या व्हिडीओवर मानसी नाईकची खरमरीत प्रतिक्रिया

लवकरच मानसी नाईक प्रदीप खेररापासून विभक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी मानसीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्याची प्रक्रिया अजूनही सुरू असून लवकरच मला योग्य तो न्याय मिळेल असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. मानसी जेव्हा पासून विभक्त होणार असे तिच्या चाहत्यांना कळाले तेव्हापासून तिला चाहत्यांनी जुळवून घेण्याचा सल्ला देण्यास सुरुवात केली. परंतु लग्नानंतर मी जे काही भोगलय त्यावरूनच मी ह्या निर्णयापर्यंत पोहोचलीये असे स्पष्टीकरण तिने दिले होते. प्रदीपने केवळ पैशांसाठी माझ्यासोबत लग्न केले. जोपर्यंत त्याला माझ्याकडून पैसा आणि प्रसिद्धी मिळत होती, तोपर्यंत तो माझ्याशी खूप चांगलं वागत होता.

manasi naik husband pradeep kharera
manasi naik husband pradeep kharera

मात्र त्यानंतर प्रदीप एकेक रंग दाखवू लागला. या चर्चा सुरू असतानाच मानसी दुःखात बुडालेली पाहायला मिळाली. तर प्रदीप मात्र मजा मस्ती करताना दिसला. मित्रांसोबत पार्ट्या करणे, तरुणींसोबत रिल्स बनवणे या गोष्टी करत असताना तो रडण्याचे किती नाटक करतोय हे तिने एका पोस्टमधून सांगितले होते. मात्र आता मानसी आपल्या करिअरमध्ये स्थिरस्थावर होत असताना, विभक्त होत असलेल्या प्रदीपची अवस्था मात्र फारच वाईट झालेली दिसत आहे. काल रविवारी प्रदिपने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये दुःखात बुडालेल्या प्रदीपचा चेहरा सुजून लालेलाल झाला होता. त्याचे डोळे सुद्धा सुजल्यासारखे वाटत होते. त्याची ही अवस्था पाहून तो रात्रभर रडत होता की काय याबाबतची चौकशी त्याचे चाहते करत आहेत.

gorgeous manasi naik
gorgeous manasi naik

प्रदीपचे मित्र त्याला दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करताना दिसले. मात्र प्रदीपचा व्हिडीओ पाहून मानसीने सुद्धा एक खरमरीत पोस्ट शेअर केलेली पाहायला मिळते आहे. आपल्याला ज्याच्यामुळे एवढा त्रास सहन करावा लागला तो प्रदीप आता त्याच्या कर्माची फळं भोगतोय हे मानसीने तिच्या पोस्टमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान मानसीला अनेकांनी प्रदीप सोबत जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता. त्या सर्वांना मानसी एवढंच म्हणते की, ठासून जावा त्यांची ज्यांना वाटत होतं, ह्याला माझ्या शिवाय कुणी नाही. मानसी आपल्या पोस्टमध्ये पुढे असेही म्हणते की, जेव्हा तुम्ही एखाद्या लग्नात नवऱ्या मुलाचे बूट चोरता त्याजागी त्याचा फोन चोरून बघा. ५०० च्या जागी तो तुम्हाला ५००० देईल. विचार बदला जग आपोआप बदलेल.

मानसी सध्या आपल्या नवनवीन येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून ती स्टेजवर परफॉर्मन्स देखील सादर करताना दिसली. त्यामुळे मानसी पुन्हा आपल्या कामामध्ये गुंतलेली पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे प्रदीप मानसीच्या विरहात अत्यंत दुःखी असल्याचे तिला भासवत आहे. प्रत्येक व्हिडीओ मधून प्रेम आणि विरहाच्या गोष्टी प्रदीप करत आहे. त्याचे हे अश्रू मानसीचे मन वळवू शकेल का, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.