झी मराठी वाहिनीवर लवकरच झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०२२ हा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यासाठी झी मराठी वाहिनीने जोरदार तयारी सुरू केलेली आहे. नुकतेच या वाहिनीने नॉमिनेशन पार्टी आयोजित केली होती. झी मराठीवरील कलाकारांनी या पार्टीत हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या नामांकन सोहळ्यात सातव्या मुलीची सातवी मुलगी, तू चाल पुढं, नवा गडी नवं राज्य, अप्पी आमची कलेक्टर, दार उघड बये या नव्याने सुरू झालेल्या मालिकांना देखील स्थान देण्यात आले आहे. खरं तर झी मराठी वाहिनीने या नव्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या समोर आणल्याने त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
तू तेव्हा तशी आणि माझी तुझी रेशीमगाठ या मालिका तर लोकप्रियतेच्या बाबतीत टॉप १० मध्ये प्रवेश मिळवताना दिसल्या. परंतु असे असले तरी वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु प्रेक्षकांनी नाराजी दर्शवल्याने त्यांच्या आग्रहाखातर ही मालिका पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. असे असले तरी अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट नायकाच्या पुरस्कारासाठी यशला मात्र डावलण्यात आलेले दिसले. नव्याने सुरू झालेल्या मालिकेतील जवळपास सर्वच नायकांना हे नामांकन देण्यात आले आहे. या यादीतून आपला आवडता नायक प्रेक्षकांना निवडणे अपेक्षित आहे, मात्र प्रेक्षकांनी यशला पसंती दिली असल्याने त्याचे नाव या यादीतच नाही. हे समजल्यावर प्रेक्षकांनी या नामांकन निवडीवर आक्षेप घेतला आहे.
नवा गडी नवं राज्य मालिकेतील राघव, तू तेव्हा तशी सौरभ, अप्पी आमची कलेक्टर अर्जुन, दार उघड बये सारंग, सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील अद्वैत साठी यावेळी नामांकन देण्यात आले आहे. ही यादी पाहून अवॉर्ड सोहळ्यात यशला नामांकन का दिले नाही? असा प्रश्न आता प्रेक्षकांनी उपस्थित केला आहे. श्रेयसचा या मालिकेतील वावर प्रेक्षकांना भावला असल्याने त्याला मुद्दामहून हे नामांकन दिले गेले नसल्याचे सांगितले जाते. प्रेक्षकांचे याबाबत म्हणणे आहे की जर यशला हे नामांकन दिले असते तर नवीन पात्रांना हा पुरस्कार मिळाला नसता. तू तेव्हा तशी मालिकेतील सौरभ, स्वप्नील जोशीला हा पुरस्कार मिळावा म्हणून वाहिनीने श्रेयसला या दूर ठेवल्याचेही प्रेक्षक म्हणत आहेत. झी वाहिनी आपला निर्णय बदलून नाराज प्रेक्षकांना आपलेसे करणार का हे पाहावे लागेल.