मराठी बिग बॉस तिसऱ्या सिजनचा ग्रँड फिनाले आज रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मीनल शाह, विशाल निकम, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे, जय दुधाने हे पाच स्पर्धक फायनलमध्ये पोहोचले आहेत. या पाच जणांमधून कोणता स्पर्धक विजेता होणार याची उत्सुकता आहे. दरम्यान बिग बॉसच्या घरात काल अगोदरच्या सदस्यांनी एन्ट्री घेतली होती. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील रंगत अधिकच वाढलेली पाहायला मिळाली. सोनालीला बिग बॉसच्या घरात पाहून विशाल खूपच खुश झाला होता. आणि तू खूप छान दिसतेस अशी प्रतिक्रिया त्याने सोनालीला दिली होती. आपल्यात जो काही वाद झाला तो मी विसरणार आहे. आपली मैत्री आहे तशीच यापुढेही राहणार आहे.
विकासबाबत बोलताना ती म्हटली की तू खूप छान दिसतोएस बाहेर. टॉप ५ मध्ये तू आहेस आणि हे तू सिद्ध केलं आहेस. टॉप ३ मध्ये तू स्वतःला कसा डीझर्व्ह करतो हे देखील मला पाहायला आवडेल असे सोनाली म्हणते. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये आज एक ट्विस्ट देण्यात आला आहे. बिग बॉसच्या घरात दुसऱ्या सिजनचा विजेता शिव ठाकरे दाखल होणार आहे. आपल्या सोबत तो एक बॅग घेऊन येतो आणि ती बॅग घरात ठेवतो. तेव्हा ह्या बॅगेत ५ लाख रुपये आहेत. ज्या स्पर्धकाला वाटतंय ही बॅग घेऊन बाहेर पडावं त्याने ती बॅग उचलावी अशी एक ऑफर या पाचही जणांना दिली आहे. मात्र विशाल ही बॅग घ्यायला नकार देतो त्याच्या पाठोपाठ मीनल देखील ही बॅग घ्यायला नकार देते. त्यावेळी उत्कर्ष हात वर करतो. उत्कर्षणे आपला हात कोणत्या कारणासाठी वर केला हे मात्र गुलदस्त्यात आहे. तो ही बॅग घेऊन बिग बॉसच्या घराबाहेर पडणार का आहि जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता कोण असणार यावर मतं देण्यात आली होती. त्यातून बहुतेकांनी विशाल निकमच विजेता होणार हेच चित्र पाहायला मिळाले. तर जय दुधाने दोन नंबरला असणार अशीही चर्चा आहे. अर्थात विशाल निकमचे चाहते विशालच विजेता ठरणार या मतावर ठाम आहेत. आणि बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता तोच ठरणार अशी खात्रीशीर माहिती देखील अनेकांनी दिलेली पाहायला मिळते आहे. मात्र पाच लाखांची ऑफर स्वीकारून उत्कर्ष घराबाहेर पडणार का ह्या प्रश्नाचे उत्तर काही वेळातच पाहायला मिळणार आहे. आणि तो हात कशासाठी वर करतो हे देखील स्पष्ट होईल. बिग बॉसचा ग्रँड फिनाले अगोदरच चित्रित करण्यात आला आहे त्यामुळे ह्या शोमध्ये विशाल निकम विजेता ठरला असल्याची बातमी लिक झाली आहे. ही बातमी कितपत खरी ठरते याचाही काही वेळातच उलगडा होईल.