Breaking News
Home / बॉलिवूड / महाभारत या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता आर्थिक अडचणीत.. मदत करण्यासाठी केली विनंती
mahabharat bheem praveen kumar sobti
mahabharat bheem praveen kumar sobti

महाभारत या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता आर्थिक अडचणीत.. मदत करण्यासाठी केली विनंती

​९० च्या दशकात ‘महाभारत’ हि दूरदर्शनची मालिका खूप गाजली होती. या मालिकेत भीमचे पात्र अभिनेते ‘प्रवीण कुमार सोबती’ यांनी साकारले होते. बी आर चोप्रा भीमच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेत असल्याचे प्रवीण कुमार यांना समजले होते. तेव्हा ऑडिशन देण्यासाठी ते तिथे पोहोचताच भरभक्कम शरीरयष्टी पाहून त्यांचे सिलेक्शन करण्यात आले. भीमची भूमिका गाजवल्यानंतर प्रवीण कुमार सोबती यांनी अनेक हिंदी चित्रपटातून काम केले होते. ​प्रविणकुमार सोबती यांनी एशियायी थाळी फेक स्पर्धेत १९६६ आणि १९७० साली सुवर्ण पदक पटकावले होते. तर १९७४ साली रजतपद​​क मिळवले तर १९६६ साली हॅमर थ्रो स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. एवढे असूनही आज सरकार त्यांच्याकडे लक्ष्य देत नाही अशी एक खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

mahabharat bheem praveen kumar sobti
mahabharat bheem praveen kumar sobti

वयाच्या ७६ व्या वर्षी प्रवीण कुमार सोबती हे आर्थिक संकटाला तोंड देत आहेत. यातून मला सरकारने मदत मिळवून द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. प्रविणकुमार सोबती यांना एक मुलगी आहे तिचे लग्न झाले आहे. प्रविणकुमार सोबती त्यांच्या पत्नीसोबत राहतात. मात्र आता मणक्याच्या त्रासामुळे आणि वयोपरत्वे त्यांना एकाच जागेवर बसून राहावे लागत आहे. शिवाय शरीर साथ देत नसल्याने आणि पोटाच्या तक्रारी यामुळे खूपच हाल होत आहेत. माझी पत्नी विना हीच माझी सर्व काळजी घेते. भीमची भूमिका केली म्हणून मला सर्वजण ओळखत होते मात्र गेल्या दोन वर्षांच्या काळात माझी कोणीच विचारपूस देखील केली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. मिडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की पंजाबमध्ये जेवढ्या सत्ता आल्या त्यातील कोणीच मला पेन्शन मिळावी म्हणून मदत केली नाही.

athlete praveen kumar sobti
athlete praveen kumar sobti

एशियन गेम्समध्ये जेवढ्या खेळाडूंनी मेडल्स मिळवली होती त्या सर्वांना पेन्शन दिली जाते. मात्र माझ्याबाबत कोणीच काही विचारपूस करत नाही. सगळ्यात जास्त गोल्ड मेडल्स मी मिळवून दिली होती, मी एकमेव एथलीट प्लेअर होतो ज्याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये रिप्रेझेंट केलं होतं. तरी देखील मला हा वाईट अनुभव मिळाला. प्रविणकुमार सोबती हे बीएसएफ मध्ये डेप्युटी कमांडेंट म्हणून कार्यरत होते. त्यामुळे सध्या बीएसएफ कडून त्यांना पेन्शन मिळत आहे. मात्र ही मदत खूपच तुटपुंजी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. माझा आर्थिक खर्च यापेक्षा जास्त असल्याने सरकारने माझी पेन्शन सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जेणेकरून त्यातून माझ्या पत्नीचा आणि माझा उदरनिर्वाह व्यवस्थित होऊ शकेल.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.