हिंदी बिग बॉसप्रमाणे आता मराठी बिग बॉस या रियालिटी शो चा प्रेक्षकवर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. गेल्याच महिन्यात बहुप्रतिक्षित बिग बॉसचा ३रा सिजन सुरू झाला. बिग बॉसच्या घरात दाखल झालेल्या स्पर्धकांमध्ये होणाऱ्या चुरशीच्या लढतीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. बिग बॉसने दिलेले टास्क कोणती टीम जास्त चांगली खेळते हे पाहणे देखील मनोरंजक ठरते त्यामुळे बिग बॉसचे स्पर्धक यासाठी थोडेथोडके मानधन नक्कीच घेणार नाहीत हे आपण जाणून आहोत. मात्र हा खेळ खेळण्यासाठी या स्पर्धकांना आठवड्याला तगडे मानधन मिळते ह्याचा खुलासा नुकताच करण्यात आला आहे. बिग बॉसच्या सिजन २चा स्पर्धक शेफ पराग कान्हेरे याने हा खुलासा केला आहे आणि त्यात तो म्हणतो की..
प्रत्येक स्पर्धकाला हुशारीने खेळण्यासाठी बिगबॉस दर आठवड्याला सुमारे लाख रुपये देते. SAD TO SAY या स्पर्धकांना त्याची किंमत नाही… सिजन २ मध्ये असताना पराग कान्हेरेने बिग बॉसचे नियम मोडले होते. बिग बॉसने दिलेल्या अशाच एका टास्कदरम्यान त्याने स्पर्धकाला कानाखाली वाजवली होती त्यामुळे बिग बॉसने त्याला तडकाफडकी बाहेर काढले होते. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी तो पुन्हा बिग बॉसच्या घरात यावा अशी मागणी केली होती. मात्र या चुकीवर परागला त्याच्या एका चाहत्याने नुकतीच एक आठवण करुन दिली. त्यावर पराग म्हणतो की, हो मी डिसअपॉइंट केल माझ्या फॉलोअर्सना… आणि त्याचि खंत नेहमी राहणार. तिसऱ्या सिजनच्या स्पर्धकांना एवढे मानधन मिळते तरीही ते चांगले खेळत नाहीत असेही पराग बिगबॉस शो बबत म्हणतो बिगबॉस प्रोडक्शन टीम हा शो लोकप्रिय करण्यासाठी बरेच प्रयत्न करते. मला माहित आहे की ते ब्रेकशिवाय सुमारे १६ तास काम करतात. हे स्पर्धक निकाल न देता टास्क का वाया घालवत आहेत?
सर्व मेहनत वाया जात आहे. सोनाली हुशारीने खेळत आहे. विशाल विनाकारण तिच्याशी उद्धट वागू लागला आहे. तो स्वतःच्या हितचिंतकांचे ऐकत नाही. सहानुभूती कार्ड प्रत्येक वेळी खेळल जात. Glamourgroup आक्रमकपणे खेळत आहे, पण विशाल, विकास, मीनल आणि सोनालीने नीतीमत्तेसह खेळ खेळावा. कारण ते महाराष्ट्राचे आवडते स्पर्धक आहेत. विशालला कालच टास्क सहज जिंकता आले असते कारण तृप्ती ताई त्यांच्या बाजूने होत्या. ते योग्य नियोजन करून खेळू शकले असते. मीनल आणि सोनालीला विशालच्या बॅचेसचे संरक्षण करण्याची संधी मिळायला हवी होती. मला खात्री आहे की यामुळे चांगले रिझल्ट मिळाले असते. आणि विशाल कॅप्टन झाला असता. माझ्या विधानांसाठी मला ट्रोल केले जाईल. पण विशाल माझा आवडता स्पर्धक असूनही, मला त्याच्या चुकांवर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. कारण तुमच्या सर्वांप्रमाणेच मी देखील प्रेक्षक म्हणून बिगबॉस मराठी पाहत आहे. ते पाहण्यासाठी मी माझा मौल्यवान वेळ घालवतो. या मध्ये मी सेलिब्रिटी नाही. प्रत्येकाला माझ्या मतांचा आणि पोस्टचा विरोध करण्याचा अधिकार आहे. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि नेहमीच करिन.