मित्रहो बॉलिवूड मध्ये स्वतःला पारखायची संधी मिळाली की कोणीही हर्षित होतो. इथे कलागुण असणे फार महत्वाचे असते, स्वतःला विसरून एखाद्या नव्या भूमिकेत सहज प्रवेश करता आला पाहिजे. अभिनय करणाऱ्या कलाकाराच्या दुनियेत खूपशा गोष्टी रंजक घडतात. या चित्रपट सृष्टीत काम करण्यासाठी शैक्षणिक पात्रता जास्त असावी लागत नाही, भूमिकेतील पात्राचे आयुष्य जगता आले की कलाकार पात्र ठरला जातो. लोक म्हणतात की अभिनय क्षेत्रात करिअर व्हायला नशीब चांगले असावे लागते. कदाचित हे सत्य आहे, पण नशीबाहून महत्वाचे आहे आपली आत्मीयता, मेहनत. चित्रपट सृष्टीत स्वतःला पडद्यावर आणण्यासाठी जिद्द असावीच लागते.
बॉलिवूड मध्ये अनेक छोटे मोठे कलाकार कार्यरत आहेत, यातील जे सुपरस्टार आहेत त्यांच्यामागे पूर्ण दुनिया वेडी आहे. त्यांना पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक असतात. कधी जर चुकून आपल्याला या सुपरस्टार सोबत काम करायला मिळाले तर कोणत्याही सामान्य माणसाचा आनंद गगनात न मावणारा असतो. पण बॉलिवूड मध्ये एक अभिनेत्री अशी आहे ज्या अभिनेत्रीला वयाच्या सोळाव्या वर्षी सुपरस्टार सलमान सोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. पण तीने स्पष्ट नकार दिला होता, यामागील कारण ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले. बॉलिवूडचा भाईजान म्हणून प्रसिद्ध असणारा सलमान खान याला आज कोण नाही ओळखत. तो लाखो लोकांचा आवडता अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाले आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने तो सतत चर्चेत असतो, जगभरातील लोक त्याचे दिवाने आहेत. सलमान फक्त एक अभिनेता म्हणूनच नाही तर तो एक मसीहा म्हणून देखील लोकांच्या आवडीचा आहे. त्याने आजवर अनेक गरजूंना मदत केली असून त्यांना अडचणीतून बाहेर काढले आहे. त्याने भरपूर अभिनेत्रींसोबत काम केले असून , प्रत्येक अभिनेत्री त्याला सहज पसंत करते. पण बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने सलमान सोबत काम करण्यास नकार दिला होता.