Breaking News
Home / मराठी तडका / जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी.. पत्नीच्या यशस्वी वाटचालीवर कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत
kushal badrike wife sunayana
kushal badrike wife sunayana

जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी.. पत्नीच्या यशस्वी वाटचालीवर कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

कुशल बद्रिके हा अवलिया विनोदवीर मराठी सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. विनोदाचे अचूक टायमिंग आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून त्याने अभिनय क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्या यशाचा हा वाटा तो पत्नी सूनयनाला देखील देताना दिसतो. अनेकदा आपल्या अडचणीच्या काळात पत्नीने मोलाची साथ दिली असल्याचे तो आवर्जून सांगतो. मात्र त्याच्या या खडतर प्रवासात आणि घर संसारात रमताना पत्नीचे कथक नृत्यालयात शिकण्याचे स्वप्न मात्र अपुरेच राहिलेले पाहायला मिळाले. संसाराची जबादारी सांभाळत असताना तिचा हा त्याग खूप मोठा आहे असं कुशल भावनिक होऊन म्हणताना दिसतो.

sunayana kushal badrike
sunayana kushal badrike

मात्र यातूनही अपुरे राहिलेले तिचे स्वप्न आता हळूहळू प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. सूनयनाला दिल्लीला जाऊन कथक शिकायचे होते, मात्र तिची ही ईच्छा पूर्ण होऊ शकली नाही. परंतु तू त्याच मंचावर आज परफॉर्मन्स सादर करतेस ही माझ्यासाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. आयुष्यातली सगळी स्वप्नं आकार घेर नाहीत, पण त्यातली काही साकार होतात हे खरं. ही संधी तुला देणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. आणि एकच गोष्ट सांगेन, जा सिमरन जा जी ले अपनी जिंदगी अशी एक पत्नीला उद्देशून कुशलने सोशल मीडियावर भावनिक मेसेज शेअर केला आहे. स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी कलाकाराला अनेक खस्ता खाव्या लागतात. कुशलला देखील हा स्ट्रगल चुकलेला नाही.

kushal badrike wife sunayana
kushal badrike wife sunayana

कुशल बद्रिके हा चाळीत राहणारा सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा. अंबरनाथ येथील कॉलेजमध्ये तो शिकायला होता. त्यावेळी अनेक एकांकिका त्याने साकारल्या होत्या. खुल्या एकांकिका स्पर्धेसाठी त्याचं नाव टाकण्यात आलं होतं. तेव्हा सूनयनाने ती फुलराणी मधील एक भाग सादर केला, त्या स्पर्धेत तिला बक्षीस मिळालं होतं. पुढे गडकरी रंगायतनला प्रयोग होता, त्यावेळी या दोघांची ओळख झाली. एकदा नाटकाचा प्रयोग सादर करत असताना अंधारात पळत सुटल्याने कुशलची धडक बसली. यामुळे कुशलचे दात तुटले होते. ह्या अपघातामुळे सुनयना कुशलची चौकशी करू लागली. इथूनच दोघेही एकमेकांना आवडू लागले होते. पण कुशलला तिला आपल्या प्रेमाची कबुली द्यायचे धाडसच होत नव्हते.

कारण सूनयनाची आई ह्या शाळेतल्या मुख्याध्यापिका तर वडील रिटायर्ड ब्रँच मॅनेजर. त्यामुळे ती मला स्वीकारेल का? असा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा असायचा. एक दिवस सूनयनानेच कुशलला लग्नाचं विचारलं आणि त्याने देखील पटकन हो म्हटलं. दौऱ्यावर प्रवास करताना जेव्हा तिकिटासाठी सुद्धा खिशात पैसे नसायचे, त्यावेळी सूनयना कुशलच्या पाकिटात गुपचूप पैसे टाकायची. त्यामुळे आपल्या स्ट्रगलच्या काळात सूनयनाने मला खूप साथ दिली असं तो आवर्जून सांगतो. आता सुखाचे क्षण अनुभवताना सूनयनाची राहिलेली ईच्छा पूर्ण होत असल्याचे पाहून कुशल खूपच भावुक झालेला पाहायला मिळतो. त्याचमुळे तो जा सिमरन जा जी ले अपनी जिंदगी असे म्हणत सूनयनाला पाठिंबा दर्शवतो.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.