कोणतीही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत टिकवून ठेवायची असेल तर त्यात रंजक ट्विस्ट आणावे लागतात. त्यामुळे लेखकाला या गोष्टी संभाळूनच मालिकेचे लेखन करावे लागत असते. मागच्या तीन वर्षांत स्टार प्रवाह वाहिनीला हे गणित उत्तम जमून आलेलं आहे. त्याचमुळे या वाहिनीने टॉप बारा मध्ये स्वतःचे स्थान टिकवून ठेवले आहे. ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्राची नंबर एकची मालिका ठरली आहे. या मालिकेने गेले वर्षभर आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. त्याला नवीन मालिकेनेही तगडी टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र मालिकेचे जुळून आलेले कथानक आणि कलाकारांचा उत्तम अभिनय याला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला.
नुकत्याच हाती आलेल्या टीआरपीच्या अहवालात ठरलं तर मग या मालिकेने अव्वल स्थान टिकवून ठेवलेले पाहायला मिळाले आहे. ह्या आठवड्यात सोमवारी लक्ष्मीच्या पाऊलांनी ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या पहिल्याच दिवशी मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे मालिकेचा रेटिंग ७ पॉईंटर येऊन पोहोचला. पण त्यानंतर ह्या आठवड्यात मालिकेने ६.८ रेटिंग मिळवलेले पाहायला मिळाले. त्याच बाजूला ठरलं तर मग या मालिकेला ७ रेटिंग देण्यात आले. लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेपेक्षा ठरलं तर मग ही मालिका सरस ठरली. तर दुसऱ्या बाजूला या नवीन मालिकेने जुन्या मालिकांचा टीआरपी कमी केलेला पाहायला मिळाला. आई कुठे काय करते ही नंबर २ वर असलेली मालिका आता चौथ्या नंबरवर जाऊन पोहोचली आहे.
नंबर तीनवर तुझेच मी गीत गात आहे ही मालिकाही टीआरपी रेट टिकवून ठेवून आहे. तर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आता पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. मालिकेचा २५ वर्षांचा लीप प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा होती. मात्र या मालिकेच्या ट्विस्टने फारशी कमाल घडवून आणली नाही हेच ह्या आठवड्यात सिद्ध झाले. नंबर ६ वर कुण्या राजाची गं तू राणी या मालिकेने बाजी मारली आहे तर मुरंबा, मन धागा धागा जोडते नवा, शुभ विवाह, लग्नाची बेडी या मालिका टॉप १२ मध्ये ठाण मांडून आहेत. इथे १३ व्या क्रमांकावर झी मराठी वाहिनीच्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेने आपले नाव गोवले आहे. त्यानंतर सारं काही तिच्यासाठी, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिका १८, १९ आणि २० या क्रमांकावर आहेत. तर नवा गडी नवं राज्य या मालिकेचा टीआरपी खूपच कमी असून तिला २१ व्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे.