Breaking News
Home / मालिका / ती परत आलीये मालिकेत हे कलाकार झळकणार मुख्य भूमिकेत…
ti parat aaliye tv serial
ti parat aaliye tv serial

ती परत आलीये मालिकेत हे कलाकार झळकणार मुख्य भूमिकेत…

झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात झी मराठी वाहिणीवर एक दोन नव्हे तर तब्बल ५ नव्या मालिका दाखल होणार आहेत यात आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे रात्रीस खेळ चाले ही लॉक’ डाऊन दरम्यान बंद पडलेली मालिका देखील पुनःपदर्पण करण्यास सज्ज झाली आहे. शेवंता पुन्हा परतणार असल्याने मालिकेचा प्रेक्षकवर्ग प्रचंड खुश झाला आहे.

ti parat aaliye tv serial
ti parat aaliye tv serial

ती परत आलीये मालिकेचा नवा प्रोमो या आठवड्यात वाहिनीवर पाहण्यात आला मात्र हा भयावह प्रोमो पाहून आमची मुलं घाबरतात, टीव्ही वर हा प्रोमो दाखवला जाऊ नये असा जोरदार विरोध देखील या मालिकेच्या बाबतीत झालेला पाहायला मिळतो आहे. मालिकेचा अजून एकही भाग प्रसारित झाला नाही तोच त्याला होणारा हा विरोध काहीसा चर्चेचा विषय ठरणारा आहे. तुर्तास या मालिकेत झलकणाऱ्या कलाकारांबद्दल आज जाणून घेऊयात..

kunjika kalvit marathi actress
kunjika kalvit marathi actress

ती परत आलीये ही मालिका रात्री १०.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेत मुख्य भूमीकेत अभिनेत्री “कुंजीका काळवींट” आणि अभिनेता “श्रेयस राजे” झळकणार आहेत हे स्पष्ट झाले आहे. कुंजीका काळवींट ही मालिका आणि चित्रपट अभिनेत्री आहे . सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ एक निर्णय’ या चित्रपटातून कुंजीकाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. चंद्र आहे साक्षीला आणि स्वामीनी या मालिकेत ती महत्वाच्या भूमिकेत झळकली होती. तर श्रेयस राजे या अभिनेत्यालाही तुम्ही ओळखले असेल. स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेत श्रेयसने छोटीशी भूमिका साकारली होती. श्रेयस हा नाट्य अभिनेता आहे. कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक एकांकिका साकारल्या आहेत. बाबांची शाळा हा चित्रपट आणि जिगरबाज ही आणखी एक मालिका त्याने अभिनित केली होती. श्रेयस आणि कुंजीका यांच्यासोबत आणखी कोण कोण कलाकार या मालिकेत झळकणार हे अजून गुलदस्त्यात असले तरी लवकरच याबाबत उलगडा होईल. विजय कदम यांचेही या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन होत आहे. मालिकेतला हा जुन्या कलाकारांचा ट्रेंड सध्या जोर धरताना दिसत आहे. या कलाकारांमुळे मालिका प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल यात शंका नाही…

shreyas raje marathi actor
shreyas raje marathi actor

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.