Breaking News
Home / मालिका / अभिनेता सुयश टिळक लवकरच अडकणार लग्नबंधनात.. केळवणाचे फोटो झाले व्हायरल
actor suyash tilak kelvan
actor suyash tilak kelvan

अभिनेता सुयश टिळक लवकरच अडकणार लग्नबंधनात.. केळवणाचे फोटो झाले व्हायरल

अभिनेता सुयश टिळकने अमर प्रेम या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यात त्याने छोटीशी भूमिका निभावली होती. पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेत देखील सुयश झळकला होता. मात्र झी मराठी वरील ‘का रे दुरावा’ या मालिकेतून त्याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. या मालिकेमुळे सुयशला अमाप लोकप्रियता मिळाली होती. दुर्वा, सख्या रे, बापमाणुस या त्याने अभिनित केलेल्या आणखी काही मालिका विशेष ठरल्या. सुयश टिळक अभिनेत्री अक्षया देवधर हिच्या सोबत गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. मात्र मध्यंतरी सुयशने अक्षयाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले त्यावेळी त्यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

actor suyash tilak kelvan
actor suyash tilak kelvan

ब्रेकपच्या चर्चेनंतर सुयश टिळकने आश्चर्याचा धक्का देत अभिनेत्री आणि नृत्यांगना असलेल्या आयुषी भावे सोबत जुलै महिन्यात साखरपुडा केला. आयुषी भावे ही उत्तम नृत्यांगना असून काही मंचावरून तिने आपल्या नृत्याची झलक दाखवून दिली आहे शिवाय आयुषी लवकरच आगामी चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात देखील आपले नशीब आजमावण्यास सज्ज झाली आहे. आयुषी आणि सुयश हे लवकरच लग्नबांधनात अडकणार आहेत. नुकतेच त्यांचे केळवण प्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर हिच्या घरी पार पडले आहे. हर्षदा खानविलकरने आयुषी आणि सुयशच्या केळवणाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यावरून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. हर्षदा खानविलकर आणि सुयश टिळकने स्टार प्रवाहवरील पुढचं पाऊल या मालिकेतून एकत्र काम केले होते.

suyash and aayushi bhave kelvan
suyash and aayushi bhave kelvan

सुयश आणि आयुषीच्या केळवणावेळी अभिनेत्री मृणाल देशपांडे हिने देखील हजेरी लावली. या दोघांच्या लवकरच होणाऱ्या लग्नाचे औचित्य साधून मृणाल आणि हर्षदा एकत्रित पाहायला मिळाले. येत्या काही दिवसातच सुयश आणि आयुषी लग्नबांधनात अडकणार आहेत त्यासाठीची त्यांची तयारी देखील सुरू झाली आहे. लग्नाची तारीख त्यांनी अजून जाहीर केली नसली तरी याबाबत अधिक अपडेट तुम्हाला लवकरच मिळतील. सुयश आणि आयुषीच्या लग्नाच्या बातमीवर आता प्रेक्षकांनी देखील भरघोस शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.