Breaking News
Home / मालिका / मिरचीची धुरी चालते मग मिठाचं पाणी का नाही.. महेश मांजरेकर घेणार शाळा

मिरचीची धुरी चालते मग मिठाचं पाणी का नाही.. महेश मांजरेकर घेणार शाळा

बिग बॉसच्या घरात हल्लाबोल टास्कमध्ये जय दुधाने आणि गायत्री दातार यांनी बाजी मारलेली पाहायला मिळाली. त्यामुळे संतप्त प्रेक्षकांनी टीम ए वर निशाणा साधत त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. मुळात विकास आणि विशाल यांनी हा टास्क योग्यच खेळला होता परंतु संचालक असलेला उत्कर्ष शिंदे त्यांच्याच टीमची बाजू घेणार हे जाहीर होते त्यामुळे उत्कर्षणे जय आणि गायत्रीला विजेता घोषित केले.

mahesh manjrekar big boss 3
mahesh manjrekar big boss 3

बिग बॉसच्या प्रेक्षकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. याचा समाचार महेश मांजरेकर आठवड्याच्या शेवटी नक्की घेतील अशी आशा बाळगून असलेले प्रेक्षक आता लवकरच खुश होताना दिसणार आहेत. कारण नुकत्याच एका नव्या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर यांनी सदस्यांना धारेवर धरलेले पहायला मिळत आहे. सुरेखा कुडची यांच्या बाबत तर महेश मांजरेकर यांनी ‘सुरेखा कुडची तू इकुडची का तिकुडची’ असा टोला लगावला आहे. त्यामुळे तू नेमकी कोणाच्या बाजूने खेळ खेळतेस हे लक्षात घे असा इशारा त्यांनी या खरपूस समाचारातून घेतला आहे. हल्लाबोल टास्कचा विजेता घोषित करणारा संचालक उत्कर्ष शिंदे याला देखील महेश मांजरेकर यांनी खडेबोल सुनावले आहेत. महेश मांजरेकर उत्कर्षला एक प्रश्न विचारतात, समुद्रात पोहायला गेल्याचा त्रास झाला तुला? त्यावर उत्कर्ष स्पष्टीकरण द्यायला लागतो.

bigboss3 marathi
bigboss3 marathi

त्याचे बोलणे मध्येच थांबवत महेश मांजरेकर म्हणतात की मिरचीची धुरी दिलेली चालते मग मिठाच पाणी का नाही चालत?…. जेव्हा हल्लाबोल टास्क खेळण्यात आला त्यावेळी गायत्री दातारने विकास आणि विशालला बाईकवरून उठवण्यासाठी मिरचीच्या धुरीचा वापर केला होता. मात्र हाच टास्क जेव्हा गायत्री आणि जय खेळले त्यावेळी मिठाच्या पाण्याचा वापर करण्यासाठी विचार करण्यात आला तेव्हा उत्कर्षणे मिठाच्या पाण्याला विरोध दर्शवला होता. याच कारणाने महेश मांजरेकर यांनी उत्कर्षच्या वागण्याला चुकीचे ठरवले आहे. संचालक असूनही पक्षपातीपणा करणे हे योग्य नाही असेही खडेबोल त्याला सुनावले. महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांची शाळाच घेतली असल्याने आता आजचा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक दिसत आहेत. त्यात विशेष बाब म्हणजे महेश मांजरेकर यांनी खडसावताच उत्कर्ष शिंदेचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.