Breaking News
Home / मालिका / सुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….
suyash tilak engagement
suyash tilak engagement

सुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….

चंदेरी दुनियेत अनेक कलाकार मंडळी सोबत काम करतानाच एकमेकांच्या प्रेमात पडतात तर काहीजण सेटवर भेट झाल्यावर प्रेमात पडलेले पाहायला मिळते. जवळपास सर्वच कलाकार प्रेमविवाह करतात, आपला जोडीदार आपणच निवडतात. सोशल मीडियावर नेहमी अशा जोड्या व्हायरल होत असतात, गेल्या वर्षभरात अनेकजण विवाहबद्ध झाले आहेत त्या सर्वांची माहिती आपण आपल्या कलाकार.इन्फो साईटवर वेळोवेळी टाकलेली आहे.

सध्या सोशल मीडियावर अजून एक जोडी फार चर्चेचा विषय बनत चालली आहे. या जोडीला दिवसेंदिवस खूप जास्त लोकप्रियता मिळत आहे. हि नवी जोडी आहे अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे या सुंदर कपल ची, आयुषी ही सुयशची भावी पत्नी असून त्या दोघांनी नुकताच साखरपुडा केला आहे. सध्या त्यांचे व्हायरल होत असलेले हे फोटो पाहून सोशल मीडियावर अनेकजण थक्क झाले आहेत,  कारण याआधी सुयश सोबत आयुषीला कधीच पाहिले न्हवते आणि आता अचानक तीच्या सोबत तो लग्न करत असल्याची चर्चा सुरू आहे, प्रेक्षकांसाठी हा आनंददायी धक्काच आहे. त्या दोघांना कधी एकत्र न पाहिल्यामुळे चाहते खूप चकित झाले असून, याआधी त्यांना एकत्र पाहिले नसले तरीही त्यांची ही प्रसिद्ध होत असलेली जोडी पाहून भरपूर लोक सुयशला आणि आयुषीला शुभेच्छा देत आहेत.

suyash tilak aayushi bhave
suyash tilak aayushi bhave

व्हायरल होत असलेल्या फोटोत ते दोघेही खूपच निरागस आणि सुंदर दिसत आहेत. अनेक सेलेब्रिटी आणि चाहते त्यांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. त्यांचा फोटो सर्वत्र लोकप्रिय बनत चालला आहे, त्यातील त्या दोघांचा साऊथ इंडियन अंदाज सुद्धा खूपच आकर्षक वाटत आहे. सुयश आणि आयुषी यांचे हे फोटो जरी आता व्हायरल होत असले तरी या दोघांनी जून महिन्याच्या सुरुवातीला साखरपुडा केला होता, सुयशने आयुषीच्या वाढदिवसाच्या दिवशी ही गोड बातमी सर्वाना सांगितली आहे. वेळ जरी झाला असला तरीही चाहत्यांना मात्र त्या दोघांची जोडी फार आवडली आहे. सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरू आहे, ते दोघे खूप छान दिसतात. तसेच दोघेही अभिनेत्री आणि अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत कार्यरत आहेत. त्या दोघांचेही अनेकजण चाहते आहेत शिवाय त्यांचा अभिनय सर्वत्र लोकप्रिय आहे.

आयुषी ही अभिनेत्री सह एक उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे, ती युवा डान्सिंग क्वीन या टीव्ही शोमध्ये झळकली होती. तसेच आयुषी भावे आता एका आगामी चित्रपटातुन रसिकांच्या भेटीस येणार आहे. ती अभिनय देखील अप्रतिम करते, तीची प्रत्येक कला कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर सुयश सुद्धा खूप रेखीव अभिनय करतो, तो सध्या “शुभमंगल ऑनलाईन” या मालिकेत शंतनूची भूमिका साकारत असून सर्वत्र लोकप्रिय झाला आहे. या भूमिकेतून अनेकजण त्याला पसंत करतात. आयुषी आणि सुयश हे दोघेही उत्कृष्ट कलाकार आहेत, आणि आता हे दोघे विवाहबद्ध होण्याच्या मार्गावर आहेत.

ayushi bhave suyash tilak
ayushi bhave suyash tilak

आयुषी आणि सुयश आता लग्न कधी करणार याची सर्व चाहते वाट पाहत आहेत, हे दोघे लवकरच विवाह बंधनात अडकावे अशी अनेकांची इच्छा आहे. आयुषी आणि सुयश या दोघांनाही साखरपुड्याच्या शुभेच्छा तसेच त्यांनी लवकर लग्न करून सुखी संसार थाटावा ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा. त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत जाईल आणि आम्ही पुन्हा असे मनोरंजन करणारे लेख लिहित राहू.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.