यशस्वी व्यक्तीच्या मागे त्यांची एक कष्टमयी कथा असते. काही लोक खूप हलाखीचे जीवन जगत असतात. कोणतीही गोष्ट मिळवताना त्यामागे खूप कष्ट करावे लागतात. काही लोक श्रीमंत होण्यासाठी पैसे कमवत नाहीत तर दोन वेळचे पोट भरण्यासाठी पैसे कमवून जीवन जगत असतात. सर्वांच्या जीवनात वाईट वेळ ही येत असते, त्याला सामोरे जात जगणे जरा कठीणच असते. रिअल लाईफ मध्ये कलाकाराचे जीवन खूप अवघड आहे. प्रेक्षकांना वाटत की ते खूप आरामात राहतात पण त्यामागे कष्ट केलेले असतात. त्याचे अथक परिश्रम त्यामागे असतात.
झी मराठीवर अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्व कलाकार लोकांची मन जिंकून घेतात. अशीच एक मालिका जिने कमी वेळात खूप प्रसिद्धी मिळवली त्यातील कलाकार ही फेमस झाले आहेत ती मालिका म्हणजे देवमाणूस. यातील सगळेच कलाकार उत्कृष्टरित्या अभिनय करतात. या मालिकेचा प्रेक्षकवर्ग देखील मोठा आहे, सगळ्यांना आता पुढे काय होईल याची फार उत्सुकता असते. याचे नवीन एपिसोड बघण्याची घाई इतरांप्रमाणे तुम्हालाही असेलच. झी मराठी वरील चला हवा येऊ द्या हा शो मध्ये देवमाणूस मधील सगळेच कलाकार आले होते. तेव्हा त्यांनी सगळ्यांनी आपली रियल स्टोरी सांगितली. खरच त्यामागे त्यांनी खूप कष्ट घेतलेले अनुभवायला मिळाले. मालिकेतील बजा म्हणजेच बजरंग पाटील हे पात्र सगळ्यांना माहीत असेलच.
अभिनेता किरण डांगे हा बज्या पात्र करत आहे. जेव्हा त्याने आपल्या खऱ्या.. आयुष्याबद्दल सागितले तेव्हा अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले होते. अभिनेता किरण डांगे म्हणजेच आपला बज्या आधी कल्याणमध्ये एक रिक्षा चालक होता. आपले पोट भरण्यासाठी तो हे काम करत होता. आणि आजही तो इतका प्रसिद्ध अभिनेता असूनही रिक्षा चालवत आहे. कोणत्याही कामाला कमी लेखू नये. याचे हे एक उत्तम उदाहरण आपल्याला अभिनेता किरण डांगे कडून मिळालं आहे. माणूस किती ही मोठा झालं तर आधी आपण भूतकाळातील परिस्थितीला कधीही विसरू नये. कोठेही काम करायला लाजू नये, कोणतेही काम हे कमी समजू नये. आपल्याला कशाचीही लाज वाटू नये.
माणसाची परिस्थितीच माणसाला घडवते आणि खूप काही शिकवून जाते. आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडचणीला आपण मात देत शिकत जातो. अभिनेता किरण डांगे याला अशीच प्रसिद्धी मिळत राहो.. त्याला त्याच्या भावी जीवनासाठी कलाकार.इन्फो टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा! मित्रांनो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच हा लेख तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
चित्र साभार: चित्रकार आदिक कुंभार