मराठी बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात जयला कॅप्टन बनण्याचा मान मिळाला आहे. जयच्या बाजूने सदस्यांनी मत दिल्याने त्याचे पारडे जड झाले होते. दरम्यान जय कॅप्टन व्हावा म्हणून मीराने स्वतः जवळचा टेडी, कुटुंबाचा फोटो आणि दादूसने डोक्यावरचे केस गमावले आहेत तर विशाल कॅप्टन बनावा म्हणून विकासने डोक्यावरचे केस कापले त्यावेळी विशालने सुद्धा मैत्री खातर स्वतःचे टक्कल केले. त्यांची ही मैत्री पाहून प्रेक्षक देखील अवाक झालेले दिसले.
तर सोनालीने देखील विशालच्या बाजूनेच आपले मत दिले त्यासाठी तिला ह्या आठवड्यात गळ्यात एक पाटी घालून फिरावे लागणार होते. त्या पाटीवर लिहिले होते की ‘ मी ह्या घरात राहण्यासाठी पात्र नाही’. सुरुवातीला ही पाटी गळ्यात घालण्यासाठी सोनाली साशंक होती मात्र विशालला पाठिंबा देऊन तिने ही पाटी गळ्यात घातली. मीरा सोबत झालेला वाद आणि आता पाटीवरील वाक्य पाहून सोनालीला आपला निर्णय चुकला आहे की काय असे वाटू लागले आहे. मी ह्या घरात राहण्यासाठी पात्र असूनही मी ही पाटी गळ्यात का घातली याचा पश्चाताप तिला होत आहे. विकास सोबत बोलताना तिनं आपलं मन मोकळं केलं त्यावेळी तिला ह्या निर्णयावर रडू आलं. विकास तिला समजावण्याचा प्रयत्न करतो हे गळ्यात घालायचं किंवा नाही हा चॉईस तुझ्याकडे होता की मग आता उगाच का राडतीयेस…असे म्हणून विकासने सोनालीचे रडणे थांबवले. दरम्यान सकाळच्या नाश्त्यावरून मीरा आणि सोनालीमध्ये चांगलाच वाद झाला होता. नाश्ता खूपच तिखट झालाय यावरून मिराने सोनालीला बोलले होते . आणि त्यानंतर मिराने नाश्ता न करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी सोनाली मिराची समजूत घालायला आली आणि त्यानंतर मिराचा राग मावळला.
मीरा आणि सोनालीचा वाद आणि तिने गळ्यात घातलेली पाटी सध्या सोनालीला रडवताना दिसत असली तरी यावर महेश मांजरेकर सोनालीला काय म्हणतात हे पाहावे लागेल. दरम्यान बिग बॉसच्या घरातील सदस्यांना एकमेकांबद्दल बोलण्याची संधी मिळाली होती त्यावेळी सोनाली आणि गायत्री यांच्यात चुरस रंगलेली पाहायला मिळाली. गायत्री सोनालीच्या वागण्याला खोटारडी ठरवत होती तर सोनाली ने देखील गायत्रीला चांगलेच सुनावलेले दिसले. आज बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर कोणाला धारेवर धरणार आणि कोणाचे कौतुक करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे आणि उद्याच्या एलिमीनेशनमध्ये कोणत्या सदस्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागणार याचीही आतुरता आहेच…