Breaking News
Home / मराठी तडका / बाप झालो…असे म्हणत मराठी अभिनेत्याने शेअर केले जुळ्या मुलांसोबतचा फोटो
sankarshan family
sankarshan family

बाप झालो…असे म्हणत मराठी अभिनेत्याने शेअर केले जुळ्या मुलांसोबतचा फोटो

‘बाप झालो’… असे म्हणत मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता “संकर्षण कऱ्हाडे” याने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत जुळ्या मुलांसोबत तो दिसत आहे. मुलगा आणि मुलगी अशा दोन्ही मुलांचे स्वागत करत त्याने त्यांची नावे शेअर केली आहे. मुलांची नावे काय आहेत आणि त्या नावांचा अर्थ देखील संकर्षणने आपल्या पोस्टमध्ये दिली आहेत. त्याने आपल्या दोन्ही मुलांची नावे “चि. सर्वज्ञ” आणि “कु. स्रग्वी” असे ठेवली आहेत. सर्वज्ञ चा अर्थ सर्व जाणणारा, ज्ञानी असे त्याने स्पष्टीकरण दिले आहे. तर स्रग्वीचा अर्थ पवित्र तुळस…असल्याचे त्याने सांगितले आहे. एकाचवेळी मुलगा आणि मुलगी झाल्याचे सुख संकर्षणच्या कुटुंबाला लाभले आहे.

sankarshan with wife shalaka
sankarshan with wife shalaka

३० एप्रिल २०१५ रोजी संकर्षण कऱ्हाडे शलाका सोबत विवाहबद्ध झाला होता. संकर्षणसोबत शलाकाने अनेक रिऍलिटी शोमध्ये सहभाग दर्शवला होता. चला हवा येऊ द्याच्या ममचवर देखील त्यांनी हजेरी लावली होती. २७ जून २०२१ रोजी शलाकाने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. मात्र ‘लेट पोस्ट’ असे म्हणून संकर्षणने ही बातमी आजच आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. संकर्षण कऱ्हाडे हा कलाकार मूळचा परभणीचा त्यामुळे त्याच्या बोलण्याची विदर्भ स्टाईल प्रेक्षकांना खूपच भावलेली पाहायला मिळते. प्रशांत दामले यांच्या नंतर आम्ही सारे खवय्ये चे सूत्रसंचालन संकर्षणने केले. खरं तर प्रशांत दामले यांच्या इतका सूत्रसंचालकाच्या भूमिकेत तो दमदार वाटेल की नाही याबाबत सुरुवातीला शंका होती मात्र ही शंका त्याने साफ पुसून काढली. आपल्या दिलखुलास बोलण्यातून त्याला रसिकांचीही दाद मिळत गेली. संकर्षण सुंदर कविता देखील करतो हे अनेकांना परिचयाचे झाले आहे.

sankarshan karhade
sankarshan karhade

सोशल मीडियावर अनेकदा त्याने लिहिलेल्या कविता व्हायरल झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. स्पृहा जोशी देखील सुंदर कविता लिहिते मात्र संकर्षणच्या एका कवितेला तिने भरभरून दाद दिलेली पाहायला मिळाली होती. त्याची ही कविता लॉक डाऊन दरम्यान खूपच व्हायरलही झाली होती.’ तू म्हणशील तसं’ हे त्याने अभिनित केलेलं नाटक खूप गाजलं आहे. आभास हा, माझिया प्रियाला प्रीत कळेना अशा अनेक मालिका त्याने अभिनित केल्या आहेत. महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमुळे संकर्षण प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. इथूनच त्याला खरी प्रसिद्धी मिळाली होती असे म्हणायला हरकत नाही.
आज त्याने बाप झाल्याची बातमी चाहत्यांना कळवली आहे यानिमित्त kalakar.info टीम तर्फे संकर्षण आणि शलाका यांचे खूप खूप अभिनंदन!!!…

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.