Breaking News
Home / मालिका / असा होणार आई कुठे काय करते मालिकेचा शेवट ..
aai kuthe kay karte ending
aai kuthe kay karte ending

असा होणार आई कुठे काय करते मालिकेचा शेवट ..

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेच्या आजच्या भागात अरुंधती आपल्या कुटुंबापासून दूर जाताना दिसणार आहे. अभि, यश आणि ईशा या आपल्या तिन्ही मुलांपासून दूर जाणाऱ्या आईच्या भावना कशा असतील हे अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हिने तिच्या अभिनयातून सुरेख दर्शवलेले पाहायला मिळत आहे. संजना ह्या सर्व घडामोडी तिच्या घरातून पाहत असते मात्र अरुंधती घरातून कधी बाहेर पडणार याच्याचकडे तिचे लक्ष लागून राहिले आहे.

aai kuthe kaay karate
aai kuthe kaay karate

अरुंधती घरातून बाहेर पडल्यावर अनिरुद्ध सोबत कोर्टात जाते. तिथे दोघांच्या संमतीने घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या जातात आणि कोर्टाकडून तुमच्या घटस्फोटाला मान्यता मिळाली आहे असे सांगितले जाते. यावेळी अरुंधतीची होणारी घालमेल दिग्दर्शकाने सुरेख टिपलेली पाहायला मिळते. घटस्फोटानंतर अरुंधती आपल्या गळ्यातले मंगसूत्र काढून अनिरुद्धकडे देते. जिथे नातेच संपुष्टात येते तिथे या मंगळसूत्राचे बंधन कशाला अशी भावना त्यावेळी अरुंधतीच्या मनात आली असावी आणि म्हणूनच ती आपले मंगळसूत्र अनिरुद्धच्या हातात देऊन मुक्तपणे पुढे चालू लागली. आई कुठे काय करते ही मालिका एका बंगाली मालिकेचा रिमेक आहे असे म्हटले जाते. त्यामुळे ह्या मालिकेचा शेवट काय असणार हे अगोदरच ठरलेले आहे. मालिकेत अनिरुद्धसोबत घटस्फोट घेतल्यावर अरुंधती आता काय करणार असा प्रश्न उपस्थित होतो. अरुंधती सर्व बंधनातून मुक्त झाल्याने ती आता स्वतःसाठी जगणार आहे. अरुंधतीला गायनाची आवड आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. पुढे जाऊन गायन क्षेत्रातच ती आपले करिअर करणार आहे आणि खूप मोठी गायिका बनून आपले नाव लौकिक करणार आहे. तर दुसरीकडे अनिरुद्ध संजनाशी लग्न करणार आहे. मात्र लग्नानंतर त्यांचे नाते किती काळ टिकते हे पाहणे आता रंजक होणार आहे. या सर्व घडामोडी प्रेक्षकांना आई कुठे काय करते या मालिकेच्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अरुंधतीने जे अगोदरच करायला हवे होते ते आता मालिकेच्या पुढील काही भागातून ती करताना दिसणार असल्याने मालिकेचा प्रेक्षक वर्ग ती घर सोडताना हळवा होणार मात्र दुसरीकडे ती आता स्वतःसाठी जगणार हे पाहून नक्कीच सुखावणार आहे.

star cast of aai kuthe kay karte
star cast of aai kuthe kay karte

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.