Breaking News
Home / मराठी तडका / ​मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेत्याचा थाटात पार पडला लग्न सोहळा..

​मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेत्याचा थाटात पार पडला लग्न सोहळा..

मन उडू उडू झालं या झी मराठीवरील मालिकेने मोठी लोकप्रियता मिळवली होती. मालिकेतील दिपू आणि इंद्राच्या प्रमुख पात्रासोबतच सहाय्यक कलाकारांवर देखील प्रेक्षकांनी प्रेम केलं होतं. मालिकेत इंद्राच्या भावाची म्हणजेच कार्तिकची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने मोठ्या थाटात लग्नगाठ बांधलेली आहे. त्यामुळे सेलिब्रिटींकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. कार्तिकची भूमिका अभिनेता ऋतुराज फडके याने साकारली होती. त्याची ही भूमिका विरोधी असल्यामुळे ऋतुराजला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. अवघ्या वर्षभरातच मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेण्याचे ठरवले होते.

ruturaj phadke priti risbood wedding
ruturaj phadke priti risbood wedding

मालिकेचे कथानक वाढवत राहण्यापेक्षा आणि कलाकारांना इतर नवीन प्रोजेक्टसाठी वेळ देता यावा, म्हणून ही मालिका काही भागातच संपवण्यात आली. याचे प्रेक्षकांनी स्वागत केलेले पाहायला मिळाले होते. या निर्णयामुळे मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. अशातच मालिकेतील काही कलाकार मंडळी नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तर ऋतुराजने पुनीत बालन सेलिब्रिटी क्रिकेट लीग मध्ये सहभाग दर्शवला. दोन दिवसांपूर्वी ऋतुराजने प्रीती रिसबुड सोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर काल २७ जानेवारी रोजी त्यांचे मोठ्या थाटात लग्न पार पडले. ऋतुराजने साखरपुडा आणि त्यानंतर लगेचच लग्न केल्याने त्याने चाहत्यांना एक सुखद धक्काच दिलेला पाहायला मिळाला. ऋतुराजने जिच्याशी लग्नाची गाठ बांधली ती प्रीती रिसबुड युट्युबर आहे.

ruturaj phadke man udu udu jhala
ruturaj phadke man udu udu jhala

तसेच प्रीती एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. प्रीती खऱ्या आयुष्यात फुडी असून तिला ट्रॅव्हलिंग आणि कुकिंगची आवड आहे. यासर्वांचे व्हिडीओ ती तिच्या युट्युब चॅनलवर अपलोड करत असते. तर ऋतुराजने देखील मराठी सृष्टीत एक गुणी अभिनेता म्हणून ओळख बनवली आहे. झोलझाल, वळण, मधू इथे अन चंद्र तिथे अशा मालिका आणि चित्रपटातून ऋतुराज प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. मन उडू उडू झालं या मालिकेने त्याला चांगली प्रसिद्धी मिळवून दिली होती. ऋतुराज आणि प्रीतीच्या लग्नाला मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली. पूर्णिमा तळवलकर, प्राजक्ता परब, भक्ती रत्नपारखी हे कलाकार त्याच्या लग्नाला उपस्थित होते. लग्नानिमित्त ऋतुराज फडके आणि प्रीती रिसबुड यांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.