Breaking News
Home / बॉलिवूड / ​राखी सावंत हिच्या आईचे दुःखद निधन.. दोन दिवसांपूर्वीच एनजीओला जाऊन

​राखी सावंत हिच्या आईचे दुःखद निधन.. दोन दिवसांपूर्वीच एनजीओला जाऊन

मराठी बिग बॉसच्या ४ थ्या सिजनमध्ये राखी सावंत हिने धमाल केली होती. मात्र तिला हा शो जिंकता आला नव्हता. घरातून बाहेर पडताच राखीला तिच्या आईच्या तब्येतीबाबत माहिती मिळाली. आपली आई खूप सिरीयस आहे हे तिला त्यावेळी कळाले होते. तिच्या आईला गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सर होता. मात्र आज त्यांची ही कॅन्सरशी झुंज अयशस्वी ठरली. राखीच्या आईचे आज निधन झाल्याने ती खूप खचून गेलेली आहे. राखीची आई गेल्या काही वर्षांपासून आजाराशी झुंज देत होती.

rakhi sawant mother
rakhi sawant mother

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर तिने तिच्या आईच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली होती. तिच्या आईला ब्रेन ट्युमर देखील होता आणि त्याला कॅन्सरने ग्रासले होते असे डॉक्टरांचे म्हणणे होते. तेव्हा राखीने माझ्या आईसाठी प्रार्थना करा असे तिच्या चाहत्यांना म्हटले होते. आई गंभीर आजारी असताना तिच्या आयुष्यात आणखी एक वादळ आले. आदिल दुराणी ह्याने राखी सोबत लग्न झाले नसल्याचे म्हटले  होते. यावरून एक वेगळाच वाद निर्माण झाला होता. शेवटी सलमान खानच्या मदतीने त्यांचा तुटलेला संसार पुन्हा जोडण्यास मदत झाली होती. यामुळे राखीने रडून पुरता गोंधळ केलेला होता. हे प्रकरण निवळते न निवळते तोच राखी फातिमा बनून बुरखा घालून आईच्या भेटीला आली.

actress rakhi sawant with mother
actress rakhi sawant with mother

त्यावेळी अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. मात्र या संकटांमधून बाहेर कसं पडायचं हे राखीला चांगलंच ठाऊक आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी तिने एनजीओला भेट दिली होती. तिथल्या अनाथ मुलांसाठी तिने खाऊ वाटप केला होता सोबतच पैसे सुद्धा देऊ केले होते. आपल्या आईला आजारातून बाहेर पडण्यासाठी ती असे प्रयत्न करताना दिसली. तर एका दर्ग्यात सुद्धा तिने चादर चढवली होती. राखीच्या आईची प्रकृती अधिकच खालावली होती आणि यातच तिच्या आईने अखेरचा श्वास घेतला आहे. राखीच्या आईंच्या आत्म्याला शांती मिळो अशी श्रद्धांजली तिच्या चाहत्यांकडून वाहण्यात येत आहे. या दुःखातून राखी लवकर बाहेर पडतो हीच सदिच्छा.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.