दूरदर्शन वाहिनीवरील ९० च्या दशकातील रामायण ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. गेल्या वर्षी मालिकांचे चित्रीकरण थांबवल्याने ही मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळावी अशी मागणी प्रेक्षकांनी केली होती. या मागणीचा विचार करून दुर्दशनवर पुन्हा एकदा रामायणाचा काळ प्रेक्षकांनी अनुभवला. या मालिकेला प्ररक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेत आजवरच्या सर्व मालिकांचे टीआरपीच्या बाबतीत असलेले रेकॉर्ड ब्रेक केले. मात्र दुःखाची बाब म्हणजे काल ५ ऑक्टोबर २०२१ रोजी या मालिकेतील रावणाची भूमिका गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते “अरविंद त्रिवेदी” यांचे निधन झाले असल्याचे समोर येत आहे.
अरविंद त्रिवेदी हे ८२ वर्षांचे होते. मुंबईतील कांदिवली येथे ते वास्तव्यास होते. त्यांच्या राहत्या घरी काल सकाळी ९.३० वाजता त्यांना तीव्र हृदविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले. अरविंद त्रिवेदी यांना तीन मुली आहेत. गुजराथी चित्रपट अभिनेते उपेंद्र त्रिवेदी हे त्यांचे भाऊ आहेत. अरविंद त्रिवेदी यांनी रामायण मालिकेतून रावणाची भूमिका त्यांच्या अभिनयाने अगदी सजग केली होती. त्यांची शरीयष्टी देखील धिप्पाड असल्याने ह्या भूमिकेसाठी त्यांनी निवड करण्यात आली होती. रावणाचा दरारा कसा होता हे त्यांच्या अभिनयाने त्यांनी दाखवून दिले होते. गेल्या वर्षी जेव्हा रामायण मालिका पुनःप्रक्षेपीत केली जाऊ लागली तेव्हा ते टीव्हीसमोर येऊन बसायचे. श्रीरामाला दिलेला त्रास पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील वाहिले होते. रावण म्हटला की अरविंद त्रिवेदी हेच नाव प्ररक्षकांसमोर यायचे हीच त्यांच्या अभिनयाची खरी ताकद होती.
या मालिकेव्यतिरिक्त अरविंद त्रिवेदी यांनी विक्रम और वेताळ, विश्वामित्रा या मालिकेत काम केले होते. पराया धन, जेसल तोरल, आज की ताजा खबर अशा काही मोजक्या हिंदी तसेच गुजराथी चित्रपटातून त्यांना अभिनयाची संधी मिळाली होती. अरविंद त्रिवेदी याना त्यांच्या सजग अभिनयाला गुजराथी राज्य शासनाने पुरस्कृत केले होते. उत्कृष्ट अभिनयाची तब्बल ७ पुरस्कार त्यांनी प्राप्त केले होते. अरविंद त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका अजरामर केली आहे हे प्रेक्षक कदापि विसरू शकणार नाहीत. त्यांच्या जाण्याने रामायण मालिकेतील सह कलाकारांनी खेद व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. अरविंद त्रिवेदी यांना आमच्या कलाकार.इन्फोच्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली!!!