Breaking News
Home / बॉलिवूड / तुम्हाला खरंच वाटतं का राखी सावंतला मारणं एवढं सोपं आहे.. जेलमधून बाहेर येताच पुराव्यानिशी राखीची पोलखोल
adil duraani rakhi sawant
adil duraani rakhi sawant

तुम्हाला खरंच वाटतं का राखी सावंतला मारणं एवढं सोपं आहे.. जेलमधून बाहेर येताच पुराव्यानिशी राखीची पोलखोल

राखी सावंतने लावलेल्या मारहाणीच्या आरोपानंतर तिचा नवरा आदिल दुरराणी नुकताच जेलमधून बाहेर आला आहे. पण बाहेर येताच आदिलने मिडियासमोर राखीची पोलखोल करण्यास सुरुवात केली आहे. आदिल या मिडिया रिपोर्टमध्ये म्हणतो की, राखी सावंत आणि माझी ओळख झाली त्यानंतर राखिला माहीत पडलं की मी इस्लाम धर्मीय आहे. राखी स्वतः मला फोन करून नमाज कसा पढतेत ते विचारू लागली. तिला माझ्यासोबत हज यात्रेला सुद्धा जायचं होतं. राखिला माझ्या आईवडिलांना पटवायचं होतं त्यांनी लग्नाला संमती द्यावी म्हणून ती इस्लाम धर्म सुद्धा स्वीकारणार होती.

adil duraani rakhi sawant
adil duraani rakhi sawant

राखी मला अनेकदा लग्नाबद्दल विचारू लागली शेवटी आम्ही लग्न केलं. लग्नानंतर आम्ही अनेकदा मिडियासमोर एकत्र येत होतो त्यावेळी राखी मिडियासमोर माझ्याशी लग्न कधी करणार असे विचारू लागले. तुम्हाला माहीतच असेल मी त्यावेळी गप्प बसून राहत होतो कारण आम्ही लग्न केलं होतं. तरीही राखी मुद्दामहून असं विचारण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर मी दुबईला गेलो त्यानंतर राखीचा नवरा रितेश सोबत तिची भेट झाली. रितेश सोबत एक बोलणं मी ऐकलं त्यात राखी रितेशला त्या सात दिवसाची आठवण करून देत होती. ते सात दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात चांगले दिवस होते असे म्हणताना मी तिला ऐकलं. मी शॉकमध्ये होतो की राखीला याबाबत कसं विचारू? पण त्यानंतर राखी बिग बॉसमध्ये गेली.

rakhi sawant husaband
rakhi sawant husaband

मी इकडे माझ्या बीजनेसमध्ये लक्ष घातले. तिने रितेशसोबत लग्न केलं होतं पण ती मान्य करत नव्हती. तिने त्याला घटस्फोट देखील दिला नव्हता. माझ्याकडे त्यांच्या लग्नाचे पुरावे आहेत. ते दाखवत आदिलने राखीचे रितेश सोबत ११ नोव्हेंबर २०१९ रोजी लग्न झाल्याचा पुरावा दिला. मी ही गोष्ट मिडियासमोर आणू नये म्हणून राखी मला धमक्या देत होती. आमच्या दोघांतील वाद तिने शेवटी मिडियासमोर आणले. तेव्हा मी तिच्या मैत्रिणीजवळ तिच्या लग्नाबद्दल जाहीर करणार हे सांगितले. त्यानंतर राखीने मला बोलावून घेतलं आणि मिडियासमोर काही सांगू नको असं सांगितलं. माझ्या घरच्यांनाही तिने धमक्या दिल्या. मी तिच्याकडून दीड कोटी घेतले तिला मारहाण केली हे सगळं खोटं आहे उलट मलाच ती मारहाण करत होती.

मी तिला दुबईत घर घेण्यासाठी २५ लाख दिले होते. गाडी, हिऱ्याची अंगठी, डान्स अकॅडमी सुरू करण्यासाठी मीच तिला पैसे दिले. राखीला डान्स अकॅडमी कशी चालवायची याबद्दल काहीच माहिती नाही ती माझी कल्पना होती. पण मी जेलमध्ये गेलो तेव्हा तिने त्या लोकांना फसवलं आणि आता डान्स अकॅडमी बंद करून टाकली. यावेळी आदिलने राखीला दिलेल्या पैशांचे पुरावे मीडियाला दाखवले. तिच्या हाताचे ठसेही त्यावर होते. आता या प्रकरणावर राखी सावंत काय प्रतिक्रिया देतीये याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.