Breaking News
Home / मालिका / दीपू इंद्राच्या प्रेमाचं गुपित येणार समोर.. मन उडू उडू झालं मालिका आली रंजक वळणावर
indrajeet deepu
indrajeet deepu

दीपू इंद्राच्या प्रेमाचं गुपित येणार समोर.. मन उडू उडू झालं मालिका आली रंजक वळणावर

ज्या सानिकाची इच्छा नसताना तिच्यासाठी इंद्रजित साळगावकर यांचे स्थळ पसंत करणाऱ्या देशपांडे सरांना जेव्हा कळेल की त्यांची धाकटी मुलगी दीपिका ही त्याच इंद्राच्या प्रेमात पडली आहे. तेव्हा देशपांडे सरांचा होकार येईल का? ज्या सानिकाचं लग्न उध्दट कार्तिकशी लावून देण्यात नाईलाजाने का होईना पण पुढाकार घेतलेल्या इंद्राविषयीची अढी देशपांडे सरांच्या मनातून जाईल का? एकीकडे इंद्राच्या चांगुलपणाने त्याचा आदर करणाऱ्या दीपिकाच्या आईला जेव्हा कळेल की तोच इंद्रा दीपिकाशी लग्न करणार आहे. हे कळल्यावर ती मुलीची साथ देईल की विरोध करत देशपांडे सरांच्याच बाजून उभी राहील? अशा अनेक उत्सुकता निर्माण करत मन उडू उडू झालं ही मालिका सध्या रंजक वळणार आली आहे.

hruta durgule ajinkya raut
hruta durgule ajinkya raut

इतके दिवस लपवून ठेवलं दीपिका आणि इंद्रा यांच्यातील प्रेमाचं सत्य उघड करणारा प्रोमो झळकल्यावर प्रेक्षकांनाही आता पुढे काय होणार हे पाहण्याची उत्कंठा लागून राहिली आहे. मन उडू उडू झालं ही मालिका सध्या लोकप्रिय झाली आहे. हृता दुर्गुळे हीने साकारलेली दीपिका आणि अजिंक्य राऊत याने साकारलेली इंद्रजित साळगावकर या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत . या मालिकेतील इंद्रा आणि दिपू यांची केमिस्ट्री ही प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. प्रेक्षकांचे लक्ष खिळवून ठेवण्यासाठी मालिकेत काही ना काही ट्विस्ट आणावे लागतात. सध्या या मालिकेत इंद्रा आणि दीपू यांच्यातील प्रेमाचे नाते सर्वांसमोर येणार हा ट्रॅक आला आहे. इंद्रा हा दीपूच्या केसात मोगऱ्याचा गजरा माळत असताना, आपलं प्रेमही या मोगऱ्यासारखे बहरत राहूदे असं म्हणत असतो.

indrajeet deepu
indrajeet deepu

इंद्रा आणि दीपू यांचे हे बोलणे दीपूची आई मालती यांच्या कानावर पडते. दीपू आणि इंद्रा हे काही केवळ मित्र नसून त्या दोघांमध्ये प्रेमाचं नातं आहे हे ओळखायला मालतीला वेळ लागत नाही. आणि त्यांच्या डोळ्यात राग दिसतो. मालिकेच्या रविवारी प्रसारीत होणाऱ्या महाएपिसोडमध्ये मन उडू उडू झालं या मालिकेतील हे धक्कादायक वळण प्रेक्षकांना पाहता येणार आहे. देशपांडे सरांची मधली मुलगी सानिका आणि इंद्राचा भाऊ कार्तिक यांनी पळून जाऊन लग्न केल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले. यावरून देशपांडे सर सानिकाला घराबाहेर काढायला निघाले असताना सहानुभूती मिळवण्यासाठी सानिकाने ती कार्तिकपासून प्रेग्नंट असल्याचे नाटक करत आहे.

या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून देशपांडे सर आणि कार्तिकची आई यांनी कार्तिक आणि सानियाचे नातं मान्य केल्याने सध्या साळगावकर यांच्या घरात सानिकाच्या गृहप्रवेशासाठी देशपांडे कुटुंबही साळगावकरांकडे आले आहे. त्याच धामधुमीत इंद्रा आणि दीपिका यांच्या प्रेमालाही बहर आला आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून येणाऱ्या अडचणींमुळे दीपू आणि इंद्रा यांनी त्यांच्यातील प्रेम देशपांडे यांच्या घरात कळणार नाही याची दक्षता घेतली होती. पण आता दीपिकाच्या आईलाच याचा सुगावा लागणार असल्याने आधीच कार्तिकच्या वागण्याने त्रासलेले दीपूचे आई बाबा इंद्रा आणि दीपू यांच्या नात्याला स्वीकारणार की पुन्हा त्यांच्या प्रेमाला परीक्षा द्यावी लागणार हे पुढच्या काही भागात उलगडेल.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.