गेल्या दोन महिन्यांपासून झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन करत आहे. पुढील प्रसारित होणाऱ्या भागात हृता म्हणजेच दीपिका इंद्रजितला होकार देणार आहे का हे कळणार आहे. झी मराठी चायनलच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या भागाचा एक छोटासा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये इंद्रजित दीपिकाला होकार देण्यासाठी मनवताना दिसत आहे. आणि आता त्याच्या पुढे दीपिकाला नाही बोलणे शक्य नसल्याचे देखील दिसत आहे.
यामध्ये इंद्रजित दीपिकाला म्हणतो की, “मॅडम तुम्ही आठवण करुन दिलेली देशपांडे सरांची शिकवण आता तुम्हीच का विसरताय? तुम्ही सत्यापासून का पळताय. एकदा माझ्या डोळ्यात बघून तुम्ही मला नकार द्या.” आता यावर अस्वस्थ होत दीपिका म्हणते की, “हे बघा हे नात शक्य नाहीये.” आता हे बोलत असताना दीपिका इंद्रजित कडे न पाहता नजर खाली करुन बोलते. त्यामुळे इंद्रजित तिला डोळे कधीच खोटं बोलत नाहीत असं म्हणतो. यावर पुढे इंद्रजित सतत दीपिकाला तुम्ही खोटं बोलत आहात हेच म्हणतो आणि खोटं बोलण्याच कारण विचारतो. आणि दीपिका पाणावलेल्या डोळ्यांनी आणि अस्वस्थ होऊन त्याला म्हणते की, “तुम्ही मला कारण विचारू नका. बस हे नात शक्य नाही.” शेवटी इंद्रा ठीके म्हणतो आणि आयुष्यभर मी तुमची वाट पाहीन असे आश्वासनही देतो.
आता या सर्वांमध्ये जर होकार दिला नाही, तर इंद्रा आयुष्यभर आपल्यासाठी वाट पाहत राहणार. आणि होकार दिला तर हे बाबांना कधीच नाही आवडणार अशा अडचणीत दीपिका अडकली आहे. या दोघांची प्रेम कहाणी त्यांच्या ऑफिसमधून सुरू झाली. इंद्रा आणि दीपिका एकाच बँकेत काम करत होते. अशात इंद्रा थोडा गुंड प्रवृत्तीचा आहे. आणि दीपिकाला तीन बहिणी असून तिचे बाबा अतिशय प्रामाणिक आणि शिस्त प्रिय आहेत. इंद्राचा स्वभाव तसेच त्याची पार्श्वभूमी पाहता दीपिकाचे बाबा हे नात कधीच स्वीकारणार नाहीत. मात्र आता दीपिका बाबांचा विश्वास कायम ठेवणार की, इंद्राला होकार देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.