Breaking News
Home / मराठी तडका / काहीहीsss असं कुठे असतं का? प्राजक्ता माळीचे हे गुपित तुम्हाला माहीत आहे का..
director viju mane prajkata mali
director viju mane prajkata mali

काहीहीsss असं कुठे असतं का? प्राजक्ता माळीचे हे गुपित तुम्हाला माहीत आहे का..

महाराष्ट्राची हास्य जत्रा या रिऍलिटी शोची अँकर प्राजक्ता माळी हिचा एक खास किस्सा पांडू चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी शेअर केला आहे. प्राजक्ता माळीचं हसणं अनेकांना घायाळ करणारं आहे तिच्या या निखळ हास्यामागे तिची निरागसतादेखील पाहायला मिळते. प्राजक्ता प्रत्यक्षात कशी आहे याचा अंदाज देऊन विजू माने यांनी तिच्याबद्दल एक खास पोस्ट लिहिली आहे या पोस्टमध्ये विजू माने म्हणतात की,
पांडू च्या निमित्ताने, माझ्या एका मित्राचं जाहिरात शूटिंग सुरू होतं. मी सहज भेटायला म्हणून गेलो होतो. शब्बीर कॅमेराला होता आणि समोर एका मुलीचा क्लोज लागला होता. मी शब्बीरच्या कानात काहीतरी पुटपुटलो. आणि शब्बीर मोठ्याने ओरडला, “अरे, ती स्पेशलवाली लाईट मागवा रे.” लाईटमन गडबडला. शब्बीरने डोळ्याने काही तरी खाणा खुणा केल्या.

director viju mane prajkata mali
director viju mane prajkata mali

तो जाऊन लाईट घेऊन आला, तिच्यासमोर ठेवून ऑन केला. तिला सांगितलं की हा जो लाईट आहे हा लोकांच्या मनातले ओळखतो. आधी तिने “काहीहीss असं पुणेरी थाटात म्हटलं खरं, असं कुठे असतं का वगैरे म्हणाली. मग शब्बीरने लेन्समधून पाहिलं, तिला म्हणाला “तू भरतनाट्यम फार भारी करतेस करेक्ट?” ती हैराण होण्याची पहिली पायरी. “तुझे बाबा पोलिसात आहेत.” अचंबीत होण्याची पहिली पायरी. “तू पुण्याहून पोलिसांच्या एका कार्यक्रमात चारशे मुलांना घेऊन सादरीकरण केलं होतं, बरोबर?” आता मात्र तिला पटलं की खरच असा लाईट आहे जो लोकांच्या मनातल्या ओळखतो. तिच्या चेहर्‍यावर आश्चर्य ओसंडून वाहत होतं. ती आळीपाळीने त्या लाईट कडे मग कॅमेराकडे मग शब्बीर कडे पाहत होती. आणि मग थोड्या वेळाने युनिटमधील इतरांना कीव आल्यावर तिला खरं सांगितलं की मी एका कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणा म्हणून गेलो असताना. त्यावेळेस तिने ते सादरीकरण केलं होतं. मी प्रत्येक वेळी शब्बीरच्या कानात जाऊन सांगायचो.

actress prajakta mali
actress prajakta mali

मग शब्बीर लेन्समधून पाहिल्यासारखं करायचा.आणि तिला तसं सांगायचा, ती निरागस मुलगी म्हणजे प्राजक्ता माळी. तिच्या हसण्यात एक प्रकारचा गोडवा आहे. जो समोरच्या माणसाचं मन प्रसन्न होण्यास पुरेसा असतो. पांडू सिनेमाकरता मी जेव्हा तिला विचारलं, तेव्हा खरं तर तिला मुख्य भूमिकेची स्वाभाविकपणे अपेक्षा होती. पण तसं न झाल्यावरही तिने या टीमचा भाग घेण्यास प्राधान्य दिले. भूमिकेची लांबी किती आहे? यापेक्षा भूमिकेची पांडू खूप कमी अभिनेते अभिनेत्री यांना कळते. प्राजक्ताला व्यक्तिरेखेची डेप्थ कळलीच आहे, पण तिला त्या व्यक्तिरेखेचं भविष्य देखील कळलं. पांडू च्या निमित्ताने व्यवसायिक चित्रपटासाठी म्हणून हिच्यासोबत पहिल्यांदा काम केलं. अर्थातच ही सुरुवात आहे असे मी म्हणेन. पांडू चित्रपट यशस्वी होण्यामागे तुझ्या गोडव्याचा हातभार आहे हे निश्चित. थँक यू फोर बीईंग पार्ट ऑफ टीम पांडू. असे म्हणत विजू माने प्राजक्ताचं कौतुक करताना दिसत आहेत.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.