Breaking News
Home / मराठी तडका / अभिनेत्रीने नको त्या ठिकाणी गोंदविला महामृत्युंजय मंत्र.. नेटकऱ्यांनी केले ट्रोल
actress tattoo
actress tattoo

अभिनेत्रीने नको त्या ठिकाणी गोंदविला महामृत्युंजय मंत्र.. नेटकऱ्यांनी केले ट्रोल

मराठी आणि हिंदीसह तेलगू मनोरंजनसृष्टीत काम करणारी भाग्यश्री मोटे बिनधास्त अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर बोल्ड हॉट फोटो शेयर करणारी फॅशनेबल भाग्यश्री अगदी बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देत असते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सोशल मीडियावर सध्या चुकीच्या गोष्टींवर सेलिब्रिटींना ट्रोल करण्याचे प्रमाण वाढले आहे त्यातच महामृत्युंजय मंत्र नको त्या ठिकाणी गोंदवून घेतल्याने नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केले आहे.

actress tattoo
actress tattoo

शोधु कुठे या चित्रपटापासून करिअरची सुरुवात करणारी भाग्यश्री आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर कमी कालावधीत नावारूपाला आली. भाग्यश्रीने गौरव घाटणेकर सोबत काय रे रास्कला, नरेंद्र देशमुख सोबत पाटील, अनिकेत विश्वासराव आणि अंशुमन विचारे सोबत माझ्या बायकोचा प्रियकर, भाऊ कदम सोबत श्री कामदेव प्रसन्न, श्रेयस तळपदे सचित पाटील सोबत विठ्ठल अशा विविध चित्रपटात मुख्य भूमिका केल्या आहेत. देवयानी, देवा श्री गणेशा या मराठी मालिकांमध्येही प्रभावी भूमिका साकारत ओळख निर्माण केली. देवो के देव, जोधा अकबर, सिया के राम सारख्या प्रसिद्ध हिंदी मालिकांमध्येही तिने प्रमुख भूमिका केल्या. भाग्यश्री सोशल मीडियावर फोटोशूट, साईट सिईंग फॉलोअर्स सोबत शेअर करते; आपल्या बोल्ड ग्लॅमरस लुकने चाहत्यांना नेहमी घायाळ करत आली आहे.

bhagyashree mote tatoo
bhagyashree mote tatoo

भाग्यश्रीने तिच्या पाठीवर गोंदविलेला टॅटूचा व्हिडीओ नुकताच शेअर केला, पण हा व्हिडीओ पाहताच अनेक चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला. सुरुवातीपासूनच्या बोल्ड अदांमुळे बऱ्याच जणांना हा हटके अंदाज आवडला असला तरी ज्या प्रेक्षकांनी तिला धार्मिक पौराणिक मालिकांमधून आजवर पाहिले आहे त्यांना मात्र हे बिलकुल आवडले नसल्याचे जाणवते. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हा तर धर्माचा अपमान, महामृत्युंजय मंत्र पाठीवर गोंदवून घ्यायला लाज वाटली पाहिजे अशा प्रकारच्या प्रतिक्रीया चाहत्यांनी दिल्या आहेत. या सर्वांवर भाग्यश्रीने प्रतिक्रिया दिली आहे, “धर्माचा अपमान करावा आणि त्याची अवहेलना करावी इतकी मोठी मी नाहीये. महादेव मला प्रिय आहेत आणि त्यांचा मंत्र मी गोंदवून घ्यावा हि माझी इच्छा. फॅशन म्हणून करायचा असता तर ​ह्या अगोदर केला असता, हा माझा पहिला आणि शेवटचा टॅटू आहे.”

actress bhagyashree mote
actress bhagyashree mote

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.